राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील एक तरूण लग्नाआधी बेपत्ता झाला आहे. असं सांगण्यात आलं की, तरूण साऊथ आफ्रिकेहून 16 फेब्रुवारीला मुंबई विमानतळावर पोहोचला होता. तेव्हापासून त्याचा काहीच पत्ता लागला नाही. तरूणाचं आज 22 फेब्रुवारीला वरात निघणार होती. कुटुंबियांनी सगळी तयारी करून ठेवली होती. कुटुंबियांनी 19 फेब्रुवारीला मुंबईत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बाडमेरच्या डालबलीसर गावातील तरूण रेंवताराम साऊ आफ्रिकेमध्ये काम करत होता. आज म्हणजे 22 तारखेला त्याचं लग्न होणार होतं. लग्नासाठी रेवताराम 16 फेब्रुवारीला इथोपियन विमानतळावरून मुंबई विमानतळावर पोहोचला होता. पण तिथून बाहेर आल्यापासून त्याचा काही पत्ताच लागत नाहीये.
रेंवताराम गेल्या 2 वर्षांपासून साऊथ आफ्रिकेत काम करत होता. तो 16 फेब्रुवारीला विमानाने मुंबईला पोहोचला होता. परिवारातील लोकांनी फोनवर त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. पण काही झालं नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली.
दुसरीकडे मुलीच्या लग्नासाठी आई-वडील, भाऊ गेल्या एका महिन्यापासून तयारी करत होते. तेच मुलाकडील लोकांनीही लग्नाची सगळी तयारी केली होती. आज 22 फेब्रुवारीला त्याची वरात निघणार होती. पण तो मुंबईतून बेपत्ता झाला. सध्या परिवारातील लोक चिंतेत आहेत.