एकत्र लावण्यात आली चार लग्ने, वराती दरम्यान लाखो रूपये घेऊन गायब झाल्या चौघांच्याही बायका!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 04:22 PM2022-07-15T16:22:26+5:302022-07-15T16:24:17+5:30

Madhya Pradesh : पीडितने पोलिसांना सांगितलं की, त्यांना दोन मुलं आहेत ज्यांचं लग्न झालं नव्हतं. ते दिव्यांग आहेत. त्यांनी मेहनतीने सात लाख रूपये जमा केले होते.

Groom were dancing in baraat brides disappeared from behind | एकत्र लावण्यात आली चार लग्ने, वराती दरम्यान लाखो रूपये घेऊन गायब झाल्या चौघांच्याही बायका!

एकत्र लावण्यात आली चार लग्ने, वराती दरम्यान लाखो रूपये घेऊन गायब झाल्या चौघांच्याही बायका!

googlenewsNext

Wedding News: मध्यप्रदेशच्या इंदुर  जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार नवरींनी काही दलालांसोबत मिळून तरूण आणि त्यांच्या परिवारांना निशाणा बनवलं. चौघींनी लग्नासाठी आधी दीड-दीड लाख रूपये घेतले. लग्नानंतर वरात काढली जात होती, तेव्हा नवरदेव समोर होते आणि नवरी मागे होत्या. तीन नवरी रस्त्यातूनच गायब झाल्या तर एक पोट दुखत असल्याचं कारण सांगत हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि तिथून फरार झाली. पोलिसांनुसार, जगदीश कुंवरजी सुनेर यांनी गावातीलच गणेश, त्याचे वडील सत्यनारायण आणि त्याची आई सुंदरबाई, नातेवाईक महेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडितने पोलिसांना सांगितलं की, त्यांना दोन मुलं आहेत ज्यांचं लग्न झालं नव्हतं. ते दिव्यांग आहेत. त्यांनी मेहनतीने सात लाख रूपये जमा केले होते. जेव्हा याची माहिती गणेश आणि सुंदरबाईला लागली तेव्हा दोघांनी हे त्यांचा नातेवाईक महेशला सांगितलं. यानंतर गणेश आई सुंदरबाईला घेऊन जगदीशकडे गेला आणि म्हणाला, दोन्ही मुलांचं वय होत आहे तरी लग्न जुळत नाहीये का? मुली शोधायच्या असतील तर आम्हाला सांगा. आम्ही शोधू.

दोघांच्या बोलण्यात येऊन जगदीशनेही त्यांना मुली शोधण्यासाठी सांगितलं. ते म्हणाले की, दीड लाख रूपये लागतील. सतत आठ दिवस चर्चा केल्यावर पीडितला आरोपींनी आपल्या जाळ्यात अडकवलं आणि केवळ त्यांच्या दोन मुलांनाच नाही तर त्यांच्या मेहुण्याचा मुलगा आणि गावातील एका तरूणाला लग्नाच्या नावावर फसवलं. या सर्वांकडून आरोपींनी आठ लाख रूपये घेतले होते. नंतर मंदिरात पीडितचे मुलं लखन, प्रल्हाद, मेहुण्याचा मुलगा जितेंद्र तसेच गावातील  एका तरूणाचं लग्न लावून देण्यात आलं. 

लग्नानंतर तीन डिसेंबरला चौघांचीही वरात निघाली. या दरम्यान नवरदेव आणि पाहुणे नाचत होते. तेच चौरही नव्या नवरी मागे होत्या. घरी पोहोचण्याआधीच तीन नवरी एका गाडीत बसून फरार झाल्या. तर चौथी पोटदुखीचं कारण सांगत हॉस्पिटलमध्ये गेली. ती तिथून फरार झाली. जेव्हा नवरी परत आल्या नाही तेव्हा फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

या घटनेनंतर पीडित दलालांकडे पोहोचले आणि त्यांनी यांना आश्वासन दिलं. आरोपी म्हणाले की, मुली आहेत परत येतील. असं करत काही दिवस गेले. पण तरूणी काही परत आल्या नाही. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं. बऱ्याच मेहनतीनंतर तक्रार दाखल झाली. आता पोलीस चौकशी करत आहेत.

Web Title: Groom were dancing in baraat brides disappeared from behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.