लातूर : दुसराच जीएसटी क्रमांक टाकून ४१ लाख ४६ हजार ४०१ रुपयांचा जीएसटी बुडवून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आला आहे. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात सहा जणांविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, धीरजसिंग उदयसिंग ठाकूर (२९ रा. लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ठाकूर इंटरप्रायजेस या नावाने ऑनलाईन माेबाईल फाेन, डिश, टीव्ही यासह इतर बॅलेन्स रिचार्ज करण्यासाठी ग्राहकाला राेख रक्कम हस्तांतरित करण्याचा व्यवसाय दक्षिण महाराष्ट्रातील लातूर, साेलापूर, मिरज, सांगली, काेल्हापूर, काेकण आणि गाेवा राज्यासह मास्टर डीलरशिप देण्याचा व्यापार करण्यासाठी १८ डिसेंबर २०२१७ राेजी फिर्यादीसाेबत १०० रुपयांच्या बाॅन्डवर करार केला. दरम्यान, १५ ऑक्टाेबर २०१८ पर्यंत व्यवहार सुरळीत करून त्यानंतर या व्यवहारातील शासनाकडे जमा करावयाचा जीएसटी ४१ लाख ४६ हजार ४०१ रुपये फिर्यादीकडून वसूल करण्यात आली. मात्र, तो जीएसटी शासनाकडे जमा न करता फिर्यादीच्या हक्कात असलेल्या बिलामध्ये जाणीवपूर्वक खाेटा जीएसटी क्रमांक टाकून शासनाची फसवणूक केली. याबाबत फिर्यादी हा पाठपुरावा करू लागला तर तुला गुन्ह्यात अडकावून टाकीन अशी धमकी दिली.
याबाबत शुभ टेक्नाेज साेल्यूशन प्रा. लि. मुख्य संचालक, धर्मेद्रकुमार कुशवाह, सुनीलकुमार शर्मा, रमेशकुमार गुप्ता, शैलेश गुप्ता (सर्व रा. इटावा, उत्तर प्रदेश) आणि विशाल लिंबाजी कांबळे (रा. नांदेड राेड, लातूर) यांच्याविराेधात एमआयडीसी पाेलीस ठाण्यात शनिवारी गुरनं. ६५ / २०२२ कलम ४०६, ४२०, ४६८, ५०४, ५०६, १२० (ब) भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पाेलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी दिली. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक लाेखंडे करीत आहेत.