गुजरातमधील राजकोटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने 'गिलोटिन' सारख्या यंत्राचा वापर करून स्वतःचा शिरच्छेद करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृत दाम्पत्यांनी हे उपकरण घरीच बनवले होते.
१८ वर्ष लागली, नववधूचा शाप खरा ठरला! विवाहाच्या नवव्या दिवशी अतिकने केला होता पतीचा मर्डर
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हेमुभाई मकवाना (३८) आणि त्यांची पत्नी हंसाबेन (३५) यांनी विंचिया गावातील त्यांच्या शेतातील झोपडीत औजाराच्या ब्लेडने आत्महत्या केली, पती-पत्नीने आत्महत्येचे नियोजन काही दिवसापूर्वीच करुन ठेवले होते.घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे.
“दोऱ्याने बांधलेल्या गिलोटिन सारख्या यंत्राखाली डोके ठेवण्यापूर्वी या जोडप्याने अग्निकुंड तयार केले होते. त्यांनी दोरी सोडताच, लोखंडी ब्लेड त्यांच्यावर पडला, ज्यामुळे त्यांचे शीर धडा वेगळे झाले. यानंतर त्यांचे धड अग्निकुंडात पडले.
शनिवारी रात्री ही घटना घडली, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळीपोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, दोघेही गेल्या एक वर्षापासून रोज झोपडीत पूजा करत होते. या जोडप्याला दोन मुले, आई-वडील आणि इतर नातेवाईक जवळच राहतात. रविवारी सकाळी घरच्यांनाही हा प्रकार कळला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
या जोडप्याकडून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली असून, त्यामध्ये त्यांनी नातेवाईकांना आई-वडील आणि मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.