नवी दिल्ली - देशातील बहुतांश भागात खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या घटना समोर येत असतात. भेसळयुक्त पदार्थांमुळे ग्राहकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यापासून लोकांना वाचवण्यासाठी अनेकदा पोलीस आणि अन्न विभागाची पथके छापे टाकून मोठमोठ्या टोळ्यांचा पर्दाफाश करत असतात. अनेकदा भेसळ करणारे दुधात भेसळ करत असल्याचे आढळून येते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील राजकोटमध्ये पोलिसांनी 4000 लीटर भेसळयुक्त दूध जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ट्रक थांबवून चालकाची चौकशी केली असता चालकाच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. पोलिसांनी रासायनिक पदार्थापासून बनवलेले चार हजार लीटर दूध जप्त केले आहे.
मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध जप्त
डीसीपी झोन प्रवीण कुमार मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्हाला माहिती मिळाली की बनावट दूध विकले जात आहे. या अंतर्गत एका ट्रकला थांबवून चौकशी करण्यात आली, मात्र हे दूध कोठून आले याबाबत चालक काहीही सांगू शकला नाही. यानंतर पोलिसांच्या कारवाईत भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं आहे.
फॅक्ट्री लोकेशन सापडलं
प्रवीण कुमार मीणा सांगतात यांनी 'तपासात असे आढळून आले की, दूध विविध प्रकारच्या रासायनिक पदार्थांपासून बनवले जात असून ते चार महिन्यांपासून विकले जात आहे. दूध खरेदी करणाऱ्यांची नावे कळली आहेत, ज्या फॅक्ट्रीमध्ये ते बनवले जात होते, त्या फॅक्ट्रीचे लोकेशन कळले आहे. नमुना तपासणीसाठी पाठवला असून, रिपोर्टची प्रतीक्षा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.