गांधीनगर – गुजरातच्या गांधीनगर येथे खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एकाला ३ मुलींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ३ मुलींपैकी एकीची हत्या करण्यात आली आहे. विजय ठाकूर नावाच्या या आरोपीची पत्नी गर्भवती असल्याने त्याने सेक्स करण्यासाठी अल्पवयीन मुलींना शिकार बनवलं. या मुलींना घाबरवल्यास त्या कुणालाही सांगणार नाहीत असा विजयचा समज होता.
पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितले की, सुरुवातीला ७ वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक संबंध बनवले. त्या मुलीने तिच्यावर घडलेला प्रसंग कुणाला सांगितला नाही. त्यामुळे आरोपी विजयची हिंमत आणखी वाढली. त्याने अल्पवयीन मुलींना शिकार बनवण्यास सुरुवात केली. जेणेकरुन त्याचे कृत्य जगासमोर येऊ नये. आरोपी विजयची ६ वर्षाची मुलगी आहे आणि पत्नी ७ महिन्याची गर्भवती आहे. मागील १५ दिवसांपासून त्याने पत्नीसोबत सेक्स केला नव्हता त्यामुळे त्याने घृणास्पद कृत्य करायला सुरुवात केली. १० दिवसांपूर्वी त्याने एका मुलीसोबत बलात्कार केला मात्र त्या मुलीने त्याची वाच्यता कुठेही केली नाही. दिवाळीच्या दिवशी ५ वर्षाच्या मुलीला नवीन कपडे देण्याच्या बहाण्याने तिला बाहेर घेऊन गेला आणि तिच्यावर अतिप्रसंग केला. जखमी अवस्थेत या मुलीला हॉस्पिटलला आणलं तेव्हा तिच्यावर उपचार केल्यानंतर तिने आरोपीची ओळख पटवली.
६ नोव्हेंबरला एका गावात गरब्याचं आयोजन केले होते. तिथे आरोपी विजय पोहचला होता. परंतु त्याला कुठलीही मुलगी सापडली नाही. कारण उत्सव असल्याने गावातील सगळेच लोक जागे होते. त्यानंतर एका आदिवासी कुटुंबातील ३ वर्षाच्या मुलीला त्याने झोपेतून उचलून निर्जनस्थळी नेले. याठिकाणी नराधमाने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला परंतु ती मुलगी जागी झाली. तेव्हा तिचा आवाज शांत करण्यासाठी आरोपीने तिचे तोंड आणि नाक दाबले त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर मुलीच्या मृतदेहाशी त्याने बलात्कार केला आणि तिचा मृतदेह फेकून दिला.
CCTV च्या मदतीने आरोपीला बेड्या
जेव्हा पोलीस आरोपीचा शोध घेत होती तेव्हा त्यांना काही CCTV फुटेज सापडले. त्यात आरोपी विजय दिसला. त्यानंतर आरोपीच्या बाईकचा तपास घेतला तेव्हा वंशजादा गावातील तो रहिवासी असल्याचं कळालं. पोलीस जेव्हा या गावात पोहचले तेव्हा आरोपीच्या घरात जुळ्या लोकांना पाहून फसले. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचे फोन लोकेशन काढले तेव्हा खऱ्या आरोपीची ओळख पटली. या आरोपीच्या अटकेसाठी १०० पोलीस कर्मचारी सहा पथकात काम करत होते. जर आरोपीला पकडला गेला नसता तर त्याने आणखी मुलींना शिकार बनवलं असतं असं पोलिसांनी सांगितले.