Gurmeet Ram Rahim : बलात्कार आणि हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा एकदा फरलो मिळाला आहे. राम रहीमला 21 दिवसांचा फरलो मिळाली असून, मंगळवारी तो सुनरिया तुरुंगातून बाहेर आला. राम रहीमची मंगळवारी सकाळी 6.30 च्या सुमारास पोलीस संरक्षणात हरियाणाच्या सुनारिया तुरुंगातून सुटका करण्यात आली. तो आता उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बर्नावा आश्रमात फरलोचा कालावधी घालवेल. बर्नावा आश्रमाच्या मुख्य गेटवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सकाळी राम रहीम आश्रमात पोहोचलाचार पोलिस वाहनांच्या सुरक्षेत गुरमीत राम रहीम मंगळवारी सकाळी 8.26 वाजता बर्नावा येथे पोहोचले. राम रहीम आश्रमात प्रवेश करताच मुख्य गेट बंद करण्यात आले. गेटवर कडक पोलीस बंदोबस्त असून, राम रीमच्या अनुयायांना आश्रमात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. फरलोच्या नियमांनुसार, आश्रमात गर्दी जमू दिली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईही केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
राम रहीमला यापूर्वी अनेकदा फरलो आणि पॅरोल मिळाला?24 ऑक्टोबर 2020: राम रहीमला रुग्णालयात दाखल केलेल्या आईला भेटण्यासाठी पहिल्यांदा एक दिवसाचा पॅरोल मिळाला होता.21 मे 2021: आईला भेटण्यासाठी दुसऱ्यांदा 12 तासांसाठी पॅरोल देण्यात आला.7 फेब्रुवारी 2022: कुटुंबीयांना भेटण्यासाठी 21 दिवसांचा फरलो मिळाला.जून 2022: 30 दिवसांसाठी पॅरोल मिळाला. उत्तर प्रदेशातील बागपत आश्रमात पाठवले.14 ऑक्टोबर 2022: राम रहीमला 40 दिवसांसाठी पॅरोल देण्यात आला. या काळात तो बागपत आश्रमात होता आणि त्याने आपला म्युझिक व्हिडिओही रिलीज केला.21 जानेवारी 2023: सहाव्यांदा 40 दिवसांचा पॅरोल मिळाला. शाह सतनाम सिंग यांच्या जयंतीला उपस्थित राहण्यासाठी तो तुरुंगाबाहेर आला होता.20 जुलै 2023: सातव्यांदा 30 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला.21 नोव्हेंबर 2023: पुन्हा एकदा 21 दिवसांचा फरलो मिळाला.
फरलो म्हणजे काय?फरलो हा प्रकार सुट्टीसारखा आहे, ज्यामध्ये कैद्याला काही दिवस तुरुंगाबाहेर काढले जाते. फरलोचा कालावधी कैद्याच्या शिक्षेपासून आणि त्याच्या अधिकारातून दिलासा म्हणून पाहिला जातो. फरलो दीर्घकाळ शिक्षा भोगणाऱ्या कैद्यालाच दिला जातो. कैद्याला त्याचे कुटुंब आणि समाजातील सदस्यांना भेटता यावे, हा त्याचा उद्देश आहे. तुरुंग हा राज्याचा विषय असल्याने प्रत्येक राज्यात फरलोबाबत वेगवेगळे नियम आहेत. उत्तर प्रदेशात फरलो देण्याची तरतूद नाही.
राम रहीम कोणत्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे?सिरसा येथील आश्रमात दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीम 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. ऑगस्ट 2017 मध्ये पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने राम रहीमला दोषी ठरवले होते. याशिवाय डेराचा माजी व्यवस्थापक रणजीत सिंगच्या हत्येप्रकरणी गुरमीत राम रहीमलाही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.