लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - पोलीस विभागाने अवैध धंद्यांविरूद्ध कारवाईची धडक मोहिम सुरू केली असून, १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी उशिरा रिसोड येथून १.६४ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.रिसोड येथील विजयकुमार धोंडुराम तापडीया (४३) हे आपल्या स्वराज गोळी भंडार नावाच्या दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थांचा साठा, वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा बाळगून त्याची विक्री करतात, अशी गुप्त माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांना दिल्या होत्या. विशेष पथकाने १६ आॅगस्ट रोजी स्वराज गोळी भंडार रिसोड येथे विजयकुमार तापडीया यांच्या दुकानाची झडती घेतली असता, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा १ लाख ६४ हजार ५३५ रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला. पंचासमक्ष सदर गुटखा तापडीया यांच्याकडून ताब्यात घेण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी सदर प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कैलास इंगळे, पोलीस कर्मचारी भगवान गावंडे, किशोर खंडारे, प्रेम राठोड, अश्विन जाधव, बालाजी बर्वे यांनी केली.
रिसोड येथून १.६४ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 1:09 PM
वाशिम - पोलीस विभागाने अवैध धंद्यांविरूद्ध कारवाईची धडक मोहिम सुरू केली असून, १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी उशिरा रिसोड येथून १.६४ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.
ठळक मुद्देविशेष पथकाने १६ आॅगस्ट रोजी स्वराज गोळी भंडार रिसोड येथे विजयकुमार तापडीया यांच्या दुकानाची झडती घेतली.प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा १ लाख ६४ हजार ५३५ रुपये किंमतीचा गुटखा आढळून आला.