कल्याण: गुटखा विकण्यावर बंदी असताना पनवेल गोरखपूर एक्सप्रेसमध्ये गुटखा विकण्याच्या वादातून दोन फेरीवाल्याने एकावर धारदार ब्लेडने हल्ला केल्याची घटना काल घडली आहे. या घटनेत एक फेरीवाला गंभीर जखमी झाला आहे. तर हल्ला करणा:या दोन फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या फेरीवाल्यांची नावे अंकुश सरोज आणि मोहंमद बिलाल अशी आहेत. तर जखमी फेरीवाल्याचे नाव पवनकुमार गुप्ता असे आहे. पवनकुमार गुप्ता याला नाशिकच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी पनवेल गोरखपूर एक्सप्रेस कल्याण स्टेटनला पोहचली. ही गाडी टिटवाळ्य़ाचा दिशेने जात असताना गुटखा विकण्याच्या वादातून तीन फेरीवाल्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी पवनकुमार गुप्ता यांच्यावर अंकुश सरोज आणि मोहमंद बिलाल शेख या दोघांनी ब्लेडने हल्ला केला. या हल्ल्यात पवनकुमार गुप्ता हा फेरीवाला गंभीर जखमी झाला आहे.
फेरीवाल्यांच्या हल्ल्यामुळे गाडीत गोंधळ उडाला. त्यामुळे प्रवासी भयभीत झाले होते. गाडीतील टीसीने या घटनेची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली. त्यावेळी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शारदूल यांनी थेट कसारा स्थानक गाठले. कसारा स्थानकात हल्ला करणा:या दोन आरोपीना अटक केली. जखमी पवनला त्यांनी नाशिकच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधिकारी पंढरीनाथ कांदे करीत आहेत. सध्या गाडीतून प्रवास करणा:यासाठी लस घेणो आवश्यक आहे. लस न घेतलेल्या नागरीकांना प्रवासी मुभा नाही. अशा परिस्थितीत गुटका विक्रीवर बंदी असताना फेरीवाले लांबपल्ल्याच्या गाडीत गुटखा विकतात. त्यांच्यात जीवघेणी हाणामारी होऊन हल्ला होतो. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या सगळ्य़ा घटनेमुळे रेल्वे सुरक्षा बलाचे जवान करतात काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.