लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - काशीमीरा भागात गुटख्याची तस्करी करणारा टेम्पो सह १२ लाख ८७ हजारांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे . पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी चालक पळून गेला आहे .
काशीमीरा भागात गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती हरीश शेट्टी यांना मिळाली असता त्यांनी एका टेम्पोत गुटख्याचा साठा भरला जात असताना तो टेम्पो पोलिसांना पकडून दिला . या दरम्यान टेम्पोचा चालक पळून गेला . काशीमीरा पोलिसांनी टेम्पो व त्यातील गुटख्याचा साठा जप्त केला आहे .
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे . इतक्या मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असताना अन्न व औषध प्रशासना सह पोलिसांना याची कुणकुण न लागल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे . सदर गुटखा हा गुजरात राज्यातून आणला जातो व मुंबई , ठाणे , पालघर आदी जिल्ह्यात वितरित केला जात असल्याचा संशय आहे .