लातूर : शहरासह परिसरत गुटख्याची चाेरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या एका टेम्पाेसह दाेघांना माेठ्या शिताफिने ताब्यात घेण्यात आले. यावेळी टेम्पाेसह जवळपास ७ लाख ६९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर तालुक्यातील गंगापूर मार्गावर एका टेम्पाेतून (एम.एच. २५ पी. ४३१३) गुटख्याची विक्री करण्यासाठी दाेघे संशीयीत फिरत असल्याची माहिती खबऱ्याने लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक गणेश कदम यांना दिली. या माहितीच्या आधारे पथकाने गंगापूर भागात शुक्रवारी सायंकाळी सापळा लावला. दरम्यान, या मार्गावरुन येणाऱ्या टेम्पाेला अडवत झाडाझडती घेतली. त्यात विविध प्रकारचा पान मसाला, गुटख्याचे पाेती आढळून आली. यावेळी दाेघांना ताब्यात घेत चाैकशी केली असता, मुकरम उस्मान पटेल (२७ रा. लातूर) आणि अल्ताफ जब्बार शेख (२८ रा.खडगाव, ता. लातूर) अशी त्यांनी नावे सांगितली. सखाेल चाैकशीनंतर मालक रफिक जब्बार शेख (३५ रा. लातूर) यांच्याकडून हा साठा घेतल्याचे सांगितले. दरम्यान, बार्शी राेड आणि खाडगाव येथून गुटखा (किंमत ५ लाख ६९ हजार २५० रुपये) आणि टेम्पाे ( किंमत २ लाख) असा एकूण ७ लाख ६७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर इतर साथीदार पळून गेल्याचे पाेलिसांनी सांगितले.
ही कारवाई पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराज जैन, उपविभागीय पाेलीस अधिकारी सुनील गाेसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक गणेश कदम, सपाेनि. प्रतिभा ठाकूर, रविंद्र बिराजदार, धनराज गायकवाड, बाबुराव येनकुरे, सचिन चंद्रपाटले, अंगद देशमुख, राहुल दराेडे, दाजीबा यादव, अनिल वाघे, अनिल जगदाळे, सतिश लामतुरे, उत्तम देवके, जब्बार पठाण, अक्षय डिगाेळे, संताेष थाेरात, किशाेर आळणे यांच्या पथकाने केली.