तलावात बुडून झाला नातवाचा मृत्यू, आजोबाने सांत्वनासाठी आलेल्यांवर केली अंधाधुंद फायरिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 03:25 PM2021-08-14T15:25:41+5:302021-08-14T15:29:20+5:30

आरोपी व्यक्तीने ज्या लोकांवर गोळीबार केला त्यांच्यासोबत त्याचा जुना वाद सुरू होता. त्यामुळेच नातवाच्या मृत्यूने दु:खी झालेल्या आजोबाने आपल्या लायसन्स बंदुकीने फायरिंग केली.

Gwalior : Grandfather open fire on people who came for condolence for his grandson death 6 injured | तलावात बुडून झाला नातवाचा मृत्यू, आजोबाने सांत्वनासाठी आलेल्यांवर केली अंधाधुंद फायरिंग!

तलावात बुडून झाला नातवाचा मृत्यू, आजोबाने सांत्वनासाठी आलेल्यांवर केली अंधाधुंद फायरिंग!

Next

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने नातवाच्या मृत्यूनंतर शोक व्यक्त करण्यासाठी आलेल्या लोकांवर धुवांधार गोळीबार केला. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. तेच आरोपी आजोबाचा पोलीस शोध घेत आहे. आरोपी व्यक्तीने ज्या लोकांवर गोळीबार केला त्यांच्यासोबत त्याचा जुना वाद सुरू होता. त्यामुळेच नातवाच्या मृत्यूने दु:खी झालेल्या आजोबाने आपल्या लायसन्स बंदुकीने फायरिंग केली.

काय आहे प्रकरण?

ही घटना ग्वाल्हेरच्या उटीला भागातील बंधोली गावातील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गावातच राहणारे परमाल सिंह परिहार यांचा १२ वर्षाचा मुलगा साहिल शुक्रवारी सायंकाळी म्हशींना चारा खाऊ घालण्यासाठी तलावाच्या किनारी गेला होता. यादरम्यान पाय घसरून साहिल तलावात पडला. साहिलला बुडत असताना पाहून त्याच्या साथीदारांनी त्याच्या घरी याची सूचना दिली. ते पोहोचेपर्यं साहिलचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. (हे पण वाचा : वाह रे वाह! प्रेमविवाहात मदत केली म्हणून दोन भावांना मोठी शिक्षा, दंडाची रक्कम वाचून चक्रावून जाल)

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, हॉस्पिटलनंतर कुटुंबीय मुलाचा मृतदेह घेऊन घरी पोहोचले. यादरम्यान आजूबाजूचे लोक शोक व्यक्त करण्यासाठी जमा झाले होते. यामुळे संतापलेले परमालचे वडील म्हणजे मृत मुलाचे आजोबाने उदय सिंहने आपल्या लायसन्स बंदुकीने लोकांवर फायरिंग केली. उदय सिंह यांच्या परिवाराचा शेजारी राहणाऱ्या लोकांसोबत वाद सुरू होता. अशात उदय सिंह यांना वाटलं की शेजारी लोक नातवाच्या मृत्यूची खिल्ली उडवण्यासाठी आले आहेत. याच गोष्टीवर नाराज होऊन उदय सिंहने लोकांवर गोळीबार केला.

गोळ्या लागल्याने ६ लोक जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. आजोबांनी गोळीबार सुरू  करताच तिथे एकच गोंधळ उडाला. लोक इकडे-तिकडे पळू लागले होते. त्यानंतर उदय सिंह फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना हॉस्पिटलमद्ये दाखल केलं. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
 

Web Title: Gwalior : Grandfather open fire on people who came for condolence for his grandson death 6 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.