शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

२६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला ५ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 4:12 PM

कारवाई न झाल्यास पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा इशारा फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दिला होता.

ठळक मुद्देपाकिस्तान कोर्टाने टेरर फंडिंग प्रकरणी दोषी ठरवत आज ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.  मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिज सईदवर कारवाई करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर दबाव टाकला होता.

लाहोर - २६/११ मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि बंदी घातलेल्या जमात-उद-दावा या संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तान कोर्टाने टेरर फंडिंग प्रकरणी दोषी ठरवत आज ५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. सईदला लाहोर येथून अटक करण्यात आली होती. पाकिस्तानने मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सुत्रधार आणि जमात उद दावा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद व त्याच्या 12 निकटवर्तीयांविरोधात चॅरिटीच्या माध्यमातून संपत्ती जमा करुन त्याचा वापर दहशतवादी कृत्यासाठी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र, मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिज सईदवर कारवाई करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर दबाव टाकला होता. तसेच, काही महिन्यांपूर्वी त्याला संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. त्यामुळे हाफिज सईदवरील या कारवाईमुळे भारताला मोठे यश मिळाले.हाफिज सईद याला बुधवारी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागाने (सीटीडी) तेथील पंजाब प्रांतातून जुलै २०१८ला अटक केली. दहशतवादविरोधी न्यायालयासमोर एका खटल्यासाठी हजर होण्याकरिता गुजरनवाला येथून लाहोरला चाललेला असताना त्याला अटक करण्यात आली होती. त्याला कडक सुरक्षाव्यवस्था असलेल्या कोटलखपत तुरुंगात ठेवण्यात आले होते.

लष्कर ए तोयबा, जमात-उद-दावा, तसेच त्यांच्याशी संबंधित फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशन (एफआयएफ) या धर्मादाय संस्थेने केलेल्या दहशतवादी कारवाया, तसेच त्यांना पुरविलेली आर्थिक रसद याची चौकशी पाकिस्तानने करावी, असा दबाव जागतिक समुदायाने आणला होता. त्यापुढे अखेर पाकिस्तान झुकला आहे. अशी कारवाई न झाल्यास पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असा इशारा फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दिला होता.

दहशतवादी हाफिज सईद आणि पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्यात हातमिळवणी?

 

दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईद दोषी; पाकिस्तानमधील गुजरातमध्ये प्रकरण हस्तांतरित

 

हाफिज सईद तुरुंगात नाही, तर अधीक्षकांच्या बंगल्यात मजेत राहतोय

 

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद अखेर जेरबंद

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तानCourtन्यायालय26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद