शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कुख्यात गुंड छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा; बॅनर झळकल्याने एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 6:48 PM

सी.आर. सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून मध्यरात्री छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर

ठळक मुद्देआता ठाण्यात कुख्यात गुंडाला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर झळकला आहेत.या बॅनरबाजीविरोधात आता पोलीस कारवाईचा बडगा उचलण्याची शक्यता आहे. 

ठाणे -आजवर आपण वाढदिवसानिमित्त राजकीय नेते किंवा अभिनेत्यांचे बॅनर लावले जात होते. मात्र, गडकरी रंगायतन समोरील बस स्टॉपवर नाना ऊर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन या सध्या सीबीआयच्या अटकेत असलेल्या गुंडाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकले आहेत. त्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. सी.आर. सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून मध्यरात्री छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत.आता ठाण्यात कुख्यात गुंडाला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर झळकला आहेत. १३ जानेवारीला छोटा राजनचा वाढदिवस असल्याचं म्हणत त्याला बॅनरबाजी करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या बॅनर्सवर शुभेच्छुक प्रकाश भालचंद्र शेलटकर, अध्यक्ष ठाणे शहर, संगीताताई शिंदे, ठाणे शहर, महिला अध्यक्ष, राजाभाऊ गोळे, अध्यक्ष, मुंबई शहर आणि हेमचंद्र (दादा) मोरे संस्थापक - अध्यक्ष या व्यक्तींची नावे त्या बॅनरवर छोटा राजनला बॅनर लावून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

छोटा राजनला शुभेच्छा देणारा हा बॅनर ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे एका बस स्टॉपवर लावण्यात आला आहे.छोटा राजनवर महाराष्ट्रात तब्बल ७० केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. त्यात वरिष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणाचाही समावेश आहे. तसेच इतर हत्या, खंडणी, धमकावणे अशा अनेक गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्यांत छोटा राजन फरार होता. ज्याच्या मुसक्या काही वर्षांपूर्वी परदेशात आवळण्यात आल्या होत्या. छोटा राजनला २५ ऑक्टोबर २०१६ रोजी इंडोनेशियातील बाली विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले.सध्या छोटा राजन हा देशातील सर्वात मोठ्या आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या तिहार जेलमध्ये बंद असून त्याच्यावर आरोप असलेल्या अनेक प्रकरणात छोटा राजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तो सुनावणीस हजर राहतो. या बॅनरबाजीविरोधात आता पोलीस कारवाईचा बडगा उचलण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजनthaneठाणेPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग