शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग, पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 11:55 AM

Crime News : बोरीवली पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईतील भाजपा महिला नगरसेविकेच्या संपर्क कार्यालयामध्ये पार्टीच्या कार्यकर्त्याने एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपाच्या महिला नगरसेविका अंजली खेडकर यांच्या संपर्क कार्यालयात हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. मुंबईतील बोरिवलीत वॉर्ड क्रमांक १६ राम मंदिर रोड वझीरा नाका येथे अंजली खेडकर यांचे कार्यालय आहे. (harassed allegedly by another party activist inside the office of a BJP leader in Mumbai's Borivali on Aug 15.)

बोरीवली पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. तक्रार दाखल करुनही, पोलिसांनी महिनाभर दखल न घेतल्याचा महिलेचा आरोप आहे.

तक्रार न करण्यासाठी भाजपा नगरसेविकेने दबाव टाकल्याचा पीडित महिलेचा दावा आहे. तसेच, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही आणि अंजली खेडकर यांच्या कार्यालयात आपल्याला मारहाण करुन बाहेर काढण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

१५ ऑगस्टला काय घडलं?१५ ऑगस्टला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास आरोपीने सदर महिलेला भेटण्यासाठी भाजपा कार्यालयात बोलावले. त्यानंतर आरोपीने कार्यालयाचे शटर बंद केले. लॉक करुन लाईट बंद केली. महिलेने आरोपीला शटर बंद करण्याचे कारण विचारले. त्यावेळी त्याने ऑफिस चालू आहे, हे कोणाला कळू नये, असे कारण दिले. त्यानंतर आरोपीने आपल्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

आरोपीची ओळख कशी झाली?पीडित महिला बोरिवलीमध्ये रहायला आहे. पीडित महिलेला समाजसेवेची आवड असल्याने ती २०२० मध्ये खेडेकर यांच्या संपर्क कार्यालयात आली होती.  तेव्हा आरोपीशी तिथे ओळख झाली. आपल्याला समाजसेवेची आवड असल्याचे पीडीत महिलेने सांगितले. आरोपीशी ओळख झाल्यानंतर मोबाइल क्रमांकाची देवाण घेवाण झाली. महिलेचा वॉर्डच्या व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला. त्यातून त्यांना पार्टीच्या कार्यक्रमांची माहिती मिळत होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपा