कोपरगाव : घर बाधण्यासाठी आई-वडीलांकडून एक लाख आणले नाही, तसेच आई-वडीलानी डिलेवरीच्या वेळेस व्यवस्थित काळजी घेतली नाही, म्हणून मुलगा अपंग जन्माला आला. याचा राग मनात धरून वेळोवेळी विवाहितेचा शारीरीक व मानसीक छळ करण्यात आला. तसेच, तिला उपाशी पोटी ठेवून शिविगाळ दमदाटी करून मारहाणही करण्यात आली. हा प्रकार पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे २७ सप्टेबर २०१९ ते १७ मार्च २०२३ या कालावधीत महिलेच्या सासरी घडला.
याप्रकरणी प्राजक्ता अतुल जाधव ( वय २८, रा. उत्तम निवास साठेवस्ती शिवकॉलनी सर्वे २८० लेन नं. बी. लोहगाव ता. जि. पुणे हल्ली रा. कोळपेवाडी ता. कोपरगाव जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून नवरा अतुल उत्तम जाधव, सासू मंदा उत्तम जाधव, नणंद अश्विनी ज्ञानेश्वर बलकवडे, भाया राहुल उत्तम जाधव ( सर्व रा. पुणे ) यांच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस कॉन्स्टेबल व्ही. एन. कोकाटे हे करीत आहेत.