पटना - दोन्ही हातांनी रायफल आणि एके 47 चालवणाऱ्या कट्टर नक्षलवादी महिलेचे लग्न होत. त्यावेळी बोहल्यावर चढलेल्या नक्षलवादी महिलेस पोलिसांनी तिला लग्नाच्या मंडपातून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील मदनपूर जंगलात नक्षलवादी चळवळीचा प्रमुख चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुष्पा उर्फ गौरी हिला सीआरपीएफ आणि कोबरा बटालियनने लग्नाच्या मंडपातून अटक केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 7 ते 8 घटनांमध्ये या महिलेवर नक्षलवादी असल्याचा आरोप आहे. तिला अटक झाल्यानंतर गावात खळबळ माजली आहे.अटक केलेली महिला नक्षलवादी मदनपूर पोलिस ठाण्यातील लंगुराही गावची रहिवासी आहे. सीपीआय माओवादीच्या सक्रिय पथकाची सदस्या असलेल्या पुष्पा उर्फ गौरी हिला सीआरपीएफच्या पथकाने लग्नाच्या मंडपातून अटक केली. पुष्पा लंगुराही गावच्या रामसुचित सिंग भोक्ताची मुलगी आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी महिला नक्षलवाद्याचे लग्न होणार होते. लग्नाबाबत सुरक्षा दलाला सुगावा लागताच तिला अटक करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला. कृती आराखड्याचा (ऍक्शन प्लॅन) भाग म्हणून लंगुराही गावाजवळील जंगलात मोर्चा काढणाऱ्या एका महिला नक्षलवादीच्या घरावर सुरक्षा दलांनी छापा टाकला. विवाह करण्यापूर्वीच अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन
काबुल हादरलं! नमाजावेळी मशिदीत IED स्फोट, इमामासह चौघांचा मृत्यू
थरारक! ४ वर्षांच्या मुलीसह दोन भावंडं २ तास अडकले लिफ्टमध्ये, कासावीस झालेल्यांची दरवाजा कापून केली सुटका
न्यूड व्हिडीओ कॉल करून नर्सला वॉर्डबॉयने केले अशा प्रकारे ब्लॅकमेल
ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा
पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले
थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला