शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समिकरणं बदलणार? 
2
'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
3
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
4
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
5
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
6
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
7
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
8
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
9
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
10
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
11
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
12
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
13
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
14
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
15
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
16
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
17
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
18
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
19
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
20
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती

भारताच्या 'मोस्ट वाँटेड' दहशतवाद्यांचा परदेशात खात्मा! १८ महिन्यांत १८ जणांचा खेळ खल्लास, पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 7:26 PM

पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार शाहिद लतीफची बुधवारी हत्या, त्यानिमित्ताने काही घटनांवर नजर टाकूया

India Most Wanted Terrorists Killed Abroad: पठाणकोट एअरबेसवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मानला जाणारा भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफ आणि त्याचा भाऊ हरिस हाशिम यांची बुधवारी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. पाकिस्तानातील सियालकोट येथील मशिदीतून नमाज पढून बाहेर पडत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. हा ५३ वर्षीय दहशतवादी जैश-ए-मोहम्मदमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाले, तेव्हाही दहशतवाद्यांनी त्याच्या सुटकेची मागणी केली होती, यावरून तो दहशतवाद्यांसाठी किती महत्त्वाचा होता, याचा अंदाज येतो.

शाहिद लतीफ उर्फ ​​बिलाल उर्फ ​​नूर अल दिन हा जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जातो. या दहशतवादी हल्ल्यात हवाई दलाचे ७ जवान शहीद झाले होते. महत्वाची बाब म्हणजे, गेल्या दीड वर्षात परदेशात भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याच्या हत्येची ही १९वी घटना आहे. गेल्या काही काळापासून पाकिस्तान, नेपाळ, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये भारताचे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी ज्या पद्धतीने मरण पावले, त्यामुळे दहशतवादाचे सूत्रधार आणि दहशतवादाचा हत्यार म्हणून वापर करणाऱ्या देशांमध्ये खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआयने आपल्या काही दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयस्थानी हलवले आहे आणि त्यांची सुरक्षा वाढवली आहे अशा बातम्याही आल्या होत्या. या दरम्यान, भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना मारल्याच्या अशाच काही घटनांवर एक नजर टाकूया.

  • 1 मार्च 2022 - जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी जहूर मिस्त्री इब्राहिम - 1999 च्या कंदहार अपहरण प्रकरण - पाकिस्तानातील कराचीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून केली हत्या
  • 15 जुलै 2022 - रिपुदमन सिंग मलिक - कंदहार अपहरण प्रकरण - ब्रिटिश कोलंबिया, कॅनडात गोळ्या घालून हत्या
  • 19 सप्टेंबर 2022 - कुख्यात आयएसआय ऑपरेटिव्ह आणि दहशतवादी मोहम्मद लाल - नेपाळमध्ये काठमांडूच्या बाहेर गोथाटारमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून केली हत्या
  • 19 नोव्हेंबर 2022 - बब्बर खालसा आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंग संधू उर्फ ​​रिंडा - पंजाब पोलिस मुख्यालयावर रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) हल्ला प्रकरण - लाहोरच्या लष्करी रुग्णालयात रहस्यमय परिस्थितीत मृतावस्थेत आढळला - मृत्यूचे कारण ड्रग ओव्हरडोस
  • 20 फेब्रुवारी 2023 - हिज्बुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर बशीर अहमद पीर उर्फ ​​इम्तियाज आलम - रावळपिंडी येथे अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केली हत्या
  • 27 फेब्रुवारी 2023 - रोजी अलबद्र मुजाहिदीनचा दहशतवादी सय्यद खालिद रझा याला कराचीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले. हल्लेखोरांनी त्याच्या घराबाहेर गोळ्या झाडल्या.
  • 4 मार्च 2023 - रोजी पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे दहशतवादी सैर नूर शोलाबर यांची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
  • 6 मे 2023 - खलिस्तानी दहशतवादी, खलिस्तान कमांडो फोर्सचा नेता परमजीत सिंग पंजवार - पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून केली हत्या
  • 15 जून 2023 - खलिस्तानी दहशतवादी अवतार सिंग खांडा - लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला प्रकरण - यूकेच्या रुग्णालयात मृतावस्थेत - मृत्यूचे कारण ब्लड कॅन्सरचे उपचार घेत असताना विषबाधा असल्याचा अंदाज
  • 18 जून 2023 - खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर - कॅनडात गुरुद्वाराबाहेर बंदुकधारींनी गोळ्या घालून केले ठार
  • 5 ऑगस्ट 2023 - जमात-उद-दावाचा दहशतवादी मुल्ला सरदार हुसैन अरैन - पाकिस्तानमध्ये कराचीच्या नवाबशाह जिल्ह्यात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केली हत्या
  • 8 सप्टेंबर 2023 - लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख दहशतवादी मोहम्मद रिझाई उर्फ ​​अबू कासिम - पाकिस्तानच्या बेकायदेशीरपणे व्याप्त काश्मीरमध्ये गोळ्या घालून ठार
  • 12 सप्टेंबर 2023 - लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख दहशतवादी झियाउर रहमान -  पाकिस्तानमध्ये कराचीच्या गुलिस्तान-ए-जोहरमध्ये दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून केली हत्या
  • 21 सप्टेंबर 2023 - खलिस्तानी दहशतवादी सुखदुल सिंग उर्फ ​​सुखा दुनाके - कॅनडात विनिपेगमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून केली हत्या
  • 30 सप्टेंबर 2023 - दहशतवादी मुफ्ती कैसर फारुकी - मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा उजवा हात - कराचीच्या सोहराब गोठमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून केली हत्या
टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादIndiaभारतPakistanपाकिस्तानCanadaकॅनडा