काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 05:21 PM2024-10-03T17:21:00+5:302024-10-03T17:23:40+5:30

जेलमध्ये असूनही काँग्रेसचे आमदार धरमसिंह चोखर यांचा मुलगा सिकंदर हा हरियाणाच्या रस्त्यावर आलिशान कारमधून फिरताना दिसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

haryana congress dharam singh chhoker son sikandar violated law was seen roaming outside despite being jail | काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...

फोटो - आजतक

हरियाणा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आमदाराच्या मुलाने कायद्याचं उल्लंघन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेलमध्ये असूनही काँग्रेसचे आमदार धरमसिंह चोखर यांचा मुलगा सिकंदर हा हरियाणाच्या रस्त्यावर आलिशान कारमधून फिरताना दिसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या काळात एकही पोलीस कर्मचारी त्याच्यासोबत नव्हता, तर न्यायालयाने अटींसह पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. 

ईडीने यानंतर सरकारी रुग्णालयात छापा टाकला असता धक्कादायक खुलासा झाला. सिकंदर चोखर ४०० कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली जेलमध्ये आहे. मात्र आमदाराचा मुलगा आता आजारपणाच्या खोट्या बहाण्याने जेलमधून PGI रोहतकमध्ये दाखल झाला आहे आणि दररोज हॉस्पिटलमधून बाहेर पडून हरियाणाच्या रस्त्यावर फिरत आहे. पुन्हा निवडणूक लढवत असलेल्या वडिलांच्या प्रचाराबाबत आरोपी फोनवर बोलतो आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतो. आजतकने याबाबतचे एक्सक्ल्युझिव्ह वृत्त दिले आहे. 

हरियाणातील स्मलखा येथील काँग्रेस आमदार धरम सिंह चोखर आणि त्यांचा मुलगा सिकंदर हे ४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आरोपी आहेत. ईडीने आमदार आणि त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलगा सिकंदरला ईडीने अटक करून जेलमध्ये पाठवलं आहे. मात्र मुलगा रुग्णालयातून आपलं साम्राज्य चालवत आहे. हरियाणा-पंजाब उच्च न्यायालयानेही आमदार चोखर यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं असून त्यांना सरेंडर करण्याचे किंवा अटक करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र असं असतानाही ते निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत.

धरम सिंह चोखर आणि त्यांचा मुलगा सिकंदर यांच्यावर १५०० हून अधिक घर खरेदीदारांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. या दोघांविरुद्ध ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ऑगस्ट २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सिकंदरचा जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र त्यानंतर आजारपणाचे आणि मेडिकल रेकॉर्डचे कारण पुढे करून जेलपासून वाचण्याचा त्याने प्रयत्न केला आहे.

जामीन फेटाळल्यानंतर आरोपीला पीजीआय रोहतकमध्ये दोनदा दाखल करण्यात आलं. पहिल्यांदा २ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर २०२४ आणि नंतर २६ सप्टेंबर ते आत्तापर्यंत. सिकंदरला कोणताही गंभीर आजार नसल्याचा आरोप आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आमदार धरम सिंह यांचा मुलगा PGI  रोहतकमधून कायद्याला बगल देत बाहेर पडताना दिसत आहे. मेडिकल रेकॉर्डमध्येही याची पुष्टी झाली आहे. हॉस्पिटलमधून बाहेर येणं, हॉटेलमध्ये राहणं, पार्टी करणं, फोन वापरणं आदी गोष्टींसाठी तो फॉर्च्यूनर कार वापरत असल्याचा आरोप आहे.
 

Web Title: haryana congress dharam singh chhoker son sikandar violated law was seen roaming outside despite being jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.