हरयाणातील जिंद येथे सिव्हिल रुग्णालयातून एक अजब प्रकार समोर आला आहे. बुधवारी रात्री या रुग्णालयातून रात्री १२ वाजता एका चोरानं कोरोनाच्या लसी चोरल्या होत्या परंतु दुसऱ्याच दिवशी गुरूवारी त्या चोरानं सिव्हिल लाईन पोलीस स्थानकाबाहेर असलेल्या एका चहावाल्याकडे या लसी परत केल्या. तसंच त्याच्यासोबत एक संदेश लिहिलेला पेपरही दिला. त्यावर 'सॉरी मला माहित नव्हतं या कोरोनाच्या लसी आहेत,' असं यावर लिहिण्यात आलं होतं."बुधवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास जिंद येथील सिव्हिल रुग्णालयातून कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे काही डोस चोरीला गेले होती. परंतु गुरुवारी सकाळी १२ वाजता सिव्हिव लाईन पोलीस स्थानकाबाहेर असलेल्या चहावाल्याकडे बसलेल्या एका वृद्धाकडे तो चोर पोहोचला. त्याच्या हातात एक पिशवी होती. त्यानं ती पिशवी वृद्ध व्यक्तीला देत त्यात पोलीसासाठी आणलेलं जेवण असल्याचं सांगितलं आणि त्यानं पळ ठोकला." अशी माहिती जिंग पोलीसचे डिएसपी जितेंद्र खटकड यांनी दिली. वृद्ध व्यक्तीनं जेव्हा ती पिशवी पोलिसांना दिली तेव्हा त्यांना त्यात कोविशिल्ड लसीच्या १८२ वाईल आणि कोवॅक्सिनचे ४४० डोस दिसून आले. तसंच त्याच्यासोबत एक पत्रही सापडलं. त्यात 'सॉरी मला माहित नव्हचं यात कोरोनाच्या लसी आहेत,' असा संदेशही लिहिला असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, चोराला रेमडेसिवीर चोरायची होती परंतु त्यानं कोरोनाच्या लसी चोरल्या असतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. अद्याप त्या चोराची कोणतीही माहिती मिळाली नाही.
'सॉरी ... मला माहित नव्हतं यात कोरोनाच्या लसी आहेत'; पेपरवर लिहून चोरानं परत केल्या लसी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 8:53 PM
जिंद येथील सिव्हिल रुग्णालयातून बुधवारी रात्री चोरी झाल्या होत्या लसी.
ठळक मुद्देजिंद येथील सिव्हिल रुग्णालयातून बुधवारी रात्री चोरी झाल्या होत्या लसी.सध्या अधिक तपास सुरू.