शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

३८ कस्टम अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; युपीआय ॲपद्वारे उकळलेल्या खंडणीची डायरी सीबीआयच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 9:46 AM

सीबीआयची ही कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे विमानतळावरील ३८ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

- आशिष सिंहलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  जीपे तसेच अन्य युपीआय ॲपच्या माध्यमातून मुंबई विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांची चालविलेल्या खंडणी रॅकेटप्रकरणी मुंबई सीबीआयच्या पथकाने जेएनपीटी येथे दोन कस्टम हाऊस एजंटांच्या घरांची आणि कार्यालयांची आज झडती घेतली. या कारवाईत सीबीआयच्या हाती एक डायरी लागली असून, त्यातून मुंबई विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन खंडणीचा पर्दाफाश झाला आहे. दरम्यान, मुंबई विमानतळावरील  ३८ कस्टम अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. 

   युपीआय ॲप खंडणी प्रकरणात अटक करून आणि नंतर जामिनावर सुटका करण्यात आलेला कस्टम अधीक्षक आलोक कुमार प्रवाशांना कस्टम ड्युटी न आकारण्याच्या बदल्यात उकळलेली रक्कम कुठल्या तरी लोडर अथवा एजंट अशा व्यक्तींच्या खात्यात जमा करत होता. ते लोडर नंतर आपले कमिशन कापून उर्वरित रक्कम आलोक कुमारला देत असल्याचे सीबीआय अधिकाऱ्यांना आढळले होते. त्याच प्रकरणात न्हावा शेवा कस्टम हाऊसमधील या दोन एजंटांची नावे सीबीआय अधिकाऱ्यांना समजली होती. हे दोघे एजंट हे आलोक कुमारप्रमाणेच मुंबई विमानतळावरील इतर कस्टम अधिकाऱ्यांनाही त्यांनी उकळलेल्या ऑनलाइन खंडणीची रक्कम आपले कमिशन कापून रोख रकमेच्या स्वरूपात देत असत. 

सीबीआयची ही कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे विमानतळावरील ३८ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात २७ कस्टम अधीक्षक, सात कस्टम अधिकारी तसेच चार हेड हवालदारांचा समावेश आहे. मात्र, या बदल्या नियमित असून, त्यामागे अन्य कोणतेही कारण नसल्याची सारवासारव अतिरिक्त कमिशनर अजित दान यांनी केली.

असे उघडकीस आले रॅकेट...नोव्हेंबर महिन्यात कस्टम अधीक्षक आलोक कुमार याने दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून दोन युपीआय अकाऊंटच्या माध्यमातून १३ हजार आणि १७ हजार अशा रकमा उकळल्या होत्या. त्या प्रवाशाने या प्रकरणाची तक्रार सीबीआयकडे केली होती. 

खोलात जाऊन तपास केला असता, कस्टम ड्युटी चुकविण्यासाठी युपीआय ॲपद्वारे चाललेल्या या खंडणी प्रकरणाची माहिती सीबीआयच्या हाती आली होती. आलोक कुमारसह अन्य दोन अधिकारी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचेही सीबीआयला आढळले होते. ही रक्कम न्हावाशेवाचे लोडर प्रशांत अंबेडे आणि संजय जोशी यांच्या युपीआय अकाऊंटमध्ये जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्याचाच तपास करत सीबीआय एजंटांपऱ्यंत पोहोचली. 

टॅग्स :Airportविमानतळ