Hathras Gangrape : काँग्रेस नेते श्योराज जीवन यांच्या अटकेविरोधात अलिगढमध्ये रास्तारोको, निदर्शनं
By पूनम अपराज | Published: September 30, 2020 06:22 PM2020-09-30T18:22:53+5:302020-09-30T18:28:12+5:30
Hathras Gangrape : पोलिस स्टेशन गांधीपार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मणिकांत शर्मा यांनी सांगितले की, काही आंदोलक रस्त्यावर बसले होते. त्यांची समजूत काढून रस्त्यावरून हटवण्यात आले आहे.
अलिगढ - हाथरसमध्ये काँग्रेस नेते श्योराज जीवन यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी रात्री गांधी पार्क परिसरातील शिशियापाडा येथे लोकांनी रास्तारोको केला. हाथरस सामूहिक बलात्कारातील आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी तासभर निदर्शने केली. पोलिसांच्या आश्वासनावरुन आंदोलनकर्ते यांनी माघार घेतली. पोलिस स्टेशन गांधीपार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मणिकांत शर्मा यांनी सांगितले की, काही आंदोलक रस्त्यावर बसले होते. त्यांची समजूत काढून रस्त्यावरून हटवण्यात आले आहे.
घोषणाबाजी केली
माजी मंत्री श्योराज जीवन मंगळवारी हाथरस येथे जात होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखले आणि त्यांना अटक केली. याचा निषेध म्हणून ५० हून अधिक लोक अलीगढच्या शिशियापाडा येथील गांधी पार्क पोलीस चौकीसमोर रस्त्यावर बसले आणि रास्तारोको आंदोलन केले. आग्रा-अलीगढ रस्त्याच्या दुतर्फा हा रस्ता अडविण्यात आला होता. गांधी पार्क स्टेशनची पोलीस फोर्स घटनास्थळी पोहोचली. परंतु आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली आणि लवकरच श्योराज जीवन यांना सोडण्यास सांगितले. घोषणाबाजी करत असताना गोंधळ उडाला. पोलिसांच्या आश्वासनानंतर रात्री 12 वाजताच्या सुमारास लोकांनी आंदोलन मागे घेतले. गांधी पार्क पोलिस स्टेशनचे निरीक्षक मणिकांत शर्मा यांनी सांगितले की, काही आंदोलक रस्त्यावर बसले होते. त्यांची समजूत काढून त्यांना रस्त्यावरून बाजूला करण्यात आले आहे, अशी माहिती जागरणाने दिली आहे.
Hathras Gangrape : पीडितेवर पोलिसांनी जबरदस्तीने केले मध्यरात्री अंत्यसंस्कार, महिला आयोगाने मागील स्पष्टीकरण https://t.co/Dxq50mc5KH
— Lokmat (@MiLOKMAT) September 30, 2020