हाथरस - उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील एका १९ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीने उत्तर प्रदेशपोलिसांना पत्र लिहिले आहे, असा दावा केला आहे की, या प्रकरणात त्याच्यासह अन्य तीन आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे आणि त्यासाठी “न्याय” मागितला आहे. तसेच मृत मुलीच्या आई आणि भावाने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आरोपीने केला.पीडितेच्या कुटूंबाला आरोपींपैकी एका आरोपीबद्दल माहित असल्याचा पुरावा असल्याचे पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे पत्र समोर आले आहे. संदीप ठाकूर हा आरोपी इतर तीन आरोपींसह तुरूंगात आहे. त्यांने हाथरसच्या पोलिसांना पत्र लिहिले असून, तो आणि मृत मुलगी "मित्र" असल्याचा दावा केला आहे. “भेटण्याऐवजी आम्ही एकदा फोनवर बोलू लागलो,” असे त्यांनी हिंदी भाषेत हस्तलिखित पत्रात बुधवारी लिहिले. या पत्रात चारही आरोपींचे अंगठा ठसे आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी दावा केला होता की, कॉल रेकॉर्डवरून महिलेचा भाऊ संदीप ठाकूर याच्या संपर्कात असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते मार्च या काळात पीडितेच्या भाऊ आणि संदीप ठाकूर यांच्यात सुमारे 104 कॉल झाले होते, असा पोलिसांचा दावा आहे.संदीप ठाकूर याने आपल्या पत्राद्वारे तिच्या कुटुंबीयांना त्यांची मैत्री पसंत नसल्याचा आरोप केला आहे. "घटनेच्या दिवशी मी तिला शेतात भेटायला गेलो होतो, तिथे तिची आई आणि भाऊ देखील तेथे होते. तिला असे करण्यास सांगून मी घरी परतलो. त्यानंतर मी गुरांना चार घालण्यास सुरवात केली," असे तो पुढे म्हणाला."नंतर मला गावकऱ्यांकडून समजले की, त्याच्या मैत्रीमुळे तिच्या आईने आणि भावांनी तिला मारहाण केली, तिला गंभीर जखमी केले. मी तिला कधीही मारहाण केली नाही किंवा तिच्याशी काही गैर वागलो नाही. तिची आई आणि भावांनी माझ्यावर आणि तिघांवर खोटे आरोप केले आणि आम्हाला तुरुंगात पाठविले आहे. आम्ही सर्व निर्दोष आहोत. कृपया चौकशी करुन आम्हाला न्याय द्या अशी विनंती, "ते म्हणाले, अशी माहिती एनडीटीव्हीने दिली आहे.
Hathras Gangrape : खळबळजनक! तिचे कुटुंबीय आमच्या मैत्रीला विरोध करत होते, त्यांनीच तिला मारलं
By पूनम अपराज | Updated: October 8, 2020 15:51 IST
Hathras Gangrape : या प्रकरणात त्याच्यासह अन्य तीन आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे आणि त्यासाठी “न्याय” मागितला आहे. तसेच मृत मुलीच्या आई आणि भावाने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आरोपीने केला.
Hathras Gangrape : खळबळजनक! तिचे कुटुंबीय आमच्या मैत्रीला विरोध करत होते, त्यांनीच तिला मारलं
ठळक मुद्दे"नंतर मला गावकऱ्यांकडून समजले की, त्याच्या मैत्रीमुळे तिच्या आईने आणि भावांनी तिला मारहाण केली, तिला गंभीर जखमी केले.