शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Hathras Gangrape : माझ्या मुलाने तर मुलीसाठी पाणी आणले होते, आरोपीच्या आईने दिली माहिती

By पूनम अपराज | Published: October 09, 2020 7:07 PM

Hathras Gangrape: इतकेच नव्हे तर आरडाओरडा ऐकून आम्ही सर्वजण तिथे गेलो आणि लवकुशने त्या दिवशी पीडितेला पाणी दिल्याची खळबळजनक माहिती दिली आहे. 

ठळक मुद्देआरोपीची आई म्हणाली की, मुलांनी पत्रात जे लिहिले ते सत्य आहे. तिचे म्हणणे आहे की, घटनेच्या दिवशी लवकुश तिच्यासोबत शेतात चारा कापत होता.

हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या घटनेसंदर्भात तपासाची व्याप्ती सातत्याने वाढत आहे. राज्य सरकारने तयार केलेल्या एसआयटीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अधिक तीव्र केली आहे. या प्रकरणात आता आरोपीच्या आईचे खळबळजनक माहिती समोर आणली आहे. आरोपी लवकुशची आई म्हणाली की, तिचा मुलगा निर्दोष आहे. आरोपीची आई म्हणाली की, मुलांनी पत्रात जे लिहिले ते सत्य आहे. तिचे म्हणणे आहे की, घटनेच्या दिवशी लवकुश तिच्यासोबत शेतात चारा कापत होता. इतकेच नव्हे तर आरडाओरडा ऐकून आम्ही सर्वजण तिथे गेलो आणि लवकुशने त्या दिवशी पीडितेला पाणी दिल्याची खळबळजनक माहिती दिली आहे. 

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील एका १९ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीने उत्तर प्रदेशपोलिसांना पत्र लिहिले आहे, असा दावा केला आहे की, या प्रकरणात त्याच्यासह लवकुश, रवी आणि रामू या अन्य तीन आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे आणि त्यासाठी “न्याय” मागितला आहे. तसेच मृत मुलीच्या आई आणि भावाने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आरोपीने केला.

 

फोटो सौजन्य - आज तक
पीडितेच्या कुटूंबाला आरोपींपैकी एका आरोपीबद्दल माहित असल्याचा पुरावा असल्याचे पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे पत्र समोर आले आहे. संदीप ठाकूर हा आरोपी इतर तीन आरोपींसह तुरूंगात आहे. त्यांने हाथरसच्या पोलिसांना पत्र लिहिले असून, तो आणि मृत मुलगी "मित्र" असल्याचा दावा केला आहे. “भेटण्याऐवजी आम्ही एकदा फोनवर बोलू लागलो,” असे त्यांनी हिंदी भाषेत हस्तलिखित पत्रात बुधवारी लिहिले. या पत्रात चारही आरोपींचे अंगठा ठसे आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी दावा केला होता की, कॉल रेकॉर्डवरून महिलेचा भाऊ संदीप ठाकूर याच्या संपर्कात असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते मार्च या काळात पीडितेच्या भाऊ आणि संदीप ठाकूर यांच्यात सुमारे 104 कॉल झाले होते, असा पोलिसांनी दावा केला होता. मात्र, आता हे प्रकरण वेगळ्या वळणावर येत असल्याचं दिसत आहे. तर पीडितेची कुटुंबीय आरोपी पळवाटा शोधात असल्याचं सांगत आहेत, अशी माहिती आजतकने दिली आहे. 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस