Hathras Gangrape : महिला वकिलांनी लिहिले CJI यांना लिहिले पत्र, HC च्या देखरेखीखाली व्हावा तपास
By पूनम अपराज | Published: October 1, 2020 03:07 PM2020-10-01T15:07:20+5:302020-10-01T15:08:15+5:30
Hathras Gangrape : महिला वकिलांनी सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना (सीजेआय) एक पत्रही लिहून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, महिला वकिलांनी सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना (सीजेआय) एक पत्रही लिहून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पत्रात सर्व माध्यमांच्या वृत्तांचा उल्लेख करण्यात आला आहे.
यासह पुराव्यांची छेडछाड करणार्या पोलिस तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महिला वकिलांनी केली असून त्यांना त्वरित निलंबित करण्याची देखील मागणी केली आहे. यासह पीडित कुटुंबांना स्वतंत्र संस्था व मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी करण्यात आली, जेणेकरून त्यांना समस्या निर्माण होणार नाही.
वकील कीर्ति सिंह, इरम मजीद, रितु भल्ला,नंदिता राव, अदिती गुप्ता, फिरदौस मुसा, इती पांडे, अनुराधा दत्त, शाहरुख आलम, स्वाती सिंह मलिक, कृति कक्कड, एकता कपिल, मालविका राजकोटिया यांनी पत्र लिहिले आहे. तसेच पत्रावर वकील झूम झुम सरकार, वकील पूजा सहगल, वकील जेबा खैर, वकील अमिता गुप्ता, वकील संजोली मेहरोत्रा, वकील संगीता भारती, वकील आथिरा पिल्लई, वकील केवेट वाडिया, वकील आर आर डेव्हिड, वकील सताक्षी सूद, वकील अंशिका सूद वकील वारीशा फरसाट, वकील नाओमी चंद्रा आणि अनेक वकीलांनी सह्या केल्या आहेत.
धक्कादायक! मॉर्निंग वॉकचा बहाणा करून पत्नीने केला पतीचा खून https://t.co/cCjXaZmIlL
— Lokmat (@MiLOKMAT) September 30, 2020