उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. २०१८ मध्ये हाथरस Hathras येथे लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या आरोपीला जामीन मिळाला. त्यानंतर जामिनावर सुटलेला आरोपीने पीडित मुलीच्या वडिलांना सोमवारी गोळ्या घालून ठार मारले आणि त्यामुळे दिल्लीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेला उत्तर प्रदेशचा हा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.हाथरस पोलिसांनी सांगितले की, आरोपी गौरव शर्माला 2018 मध्ये लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गावातील एका मंदिराबाहेर आरोपी व पीडितेच्या कुटूंबात एखाद्या गोष्टीवरून वाद झाला आणि त्यानंतर गौरवने गोळीबार केला. पीडितेच्या वडिलांचा रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
Hathras : हाथरस हादरलं! आधी केला मुलीचा विनयभंग; जामीन मिळाल्यावर तिच्या वडिलांना घातल्या गोळ्या
By पूनम अपराज | Updated: March 2, 2021 13:42 IST
Hathras Molestation and then shot dead victim's Father : जामिनावर सुटलेला आरोपीने पीडित मुलीच्या वडिलांना सोमवारी गोळ्या घालून ठार मारले आणि त्यामुळे दिल्लीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेला उत्तर प्रदेशचा हा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Hathras : हाथरस हादरलं! आधी केला मुलीचा विनयभंग; जामीन मिळाल्यावर तिच्या वडिलांना घातल्या गोळ्या
ठळक मुद्दे महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर गौरव शर्माला स्थानिक कोर्टाने जामीन मंजूर केला, त्यानंतर तो बाहेर होता.