बांदा ( उत्तर प्रदेश) - प्रेमी युगुलाला खोलीत बंद करून जिवंत जाळण्यात आल्याची घृणास्पद घटना उत्तर प्रदेशमधीली बांदा येथे घडली आहे. बांदा येथील मटौंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी संध्याकाळी तरुणी आणि तिच्या प्रियकराला या तरुणीच्या भावाने कुटुंबीयांच्या मदतीने जिवंत जाळले. या कृत्यामध्ये अंदाजे सहा लोकांचा सहभाग असल्याचे एससपी यांनी सांगितले. या प्रकरणी तरुणीच्या भावासह दोन जणांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणीला भेटण्यासाठी तिच्याच गावातील एक तरुण रात्री उशिरा तिच्या घरी आला होता. दोघेही घरात बसून बोलत होते. तेवढ्यात याची माहिती या तरुणीच्या भावाला समजली. त्यानंतर संतप्त झालेल्या संबंधित तरुणीच्या भावाने या प्रेमी युगुलाला या घराच्या खोलीत बंद केले.दरम्यान, ही बातमी गावात पसरल्यानंतर गावातील लोकांनाही समजली. प्रेमी युगुलांचे नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले. दोन्ही बाजूंकडून रात्री उशिरापर्यंत पंचायत सुरू होती. त्याचदरम्यान, या तरुणीचा भाऊ घराच्या छप्परावर चढला आणि त्याने रॉकेल ओतून घराला आग लावली.आगीत अडकलेल्या या प्रेमी युगुलाने सुटकेसाठी विनवण्या केल्या आरडाओरडा केला. आवाज ऐकून गावकऱ्यांनी घराकडे धाव घेतली आणि दोघांनाही घराबाहेर काढले मात्र तोपर्यंत दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. या घटनेची खबर कळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. गंभीरीत्या होरपळलेल्या युगुलाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयाच्या दिशेने रवाना करण्यात आले. मात्र तरुणाने रुग्णालयात प्राण सोडले. तर तरुणीचा उपचारांसाठी कानपूर येथे नेत असताना मृत्यू झाला.दरम्यान, प्रेमी युगुलाला आपल्यासमोर जिवंत जाळून मारण्यात आल्याचा जबाब मृत तरुणाच्या वडिलांनी दिला. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मृत तरुणीच्या भावाला अटक करण्यात आली असून, वडिलांसह अन्य आरोपी फरार असल्याचे एएसपी महेंद्र चौहान यांनी सांगितले.
क्रुरतेचा कहर! प्रेमी युगुलाला खोलीत बंद करून जिवंत जाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 8:30 AM
या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मृत तरुणीच्या भावाला अटक करण्यात आली असून, वडिलांसह अन्य आरोपी फरार आहेत.
ठळक मुद्देप्रेमी युगुलाला जिवंत जाळण्यात आल्याची उत्तर प्रदेशमधीली बांदा येथे घडली बंधित तरुणीच्या भावाने या प्रेमी युगुलाला या घराच्या खोलीत बंद केलेत्यानंतर या प्रकरणी पंचायत सुरू असतानाच लावली बंद केलेल्या खोलीला आग