नवी दिल्ली : आर्थिक गुन्हे, दहशतवाद, आयपीएल सट्टेबाजी, अमली पदार्थांच्या तस्करीसह बड्या ते छोट्या ६ हजारांहून अधिक आरोपींवर चीनच्या कंपनीने पाळत ठेवल्याचे उघड झाले आहे.झेन्हुआ डाटा या कंपनीच्या डेटाबेसमधील माहितीनुसार सत्यम समूहाचे माजी चेअरमन रामलिंगा राजू यांच्या नातेवाईकांनी किंवा त्यांच्या मित्रांनी स्थापन केलेल्या १९ कंपन्यांविरुद्धचे करचुकवेगिरी प्रकरण मध्यप्रदेशातील व्यापमं घोटाळ्याचा यात समावेश आहे.१00 हून अधिक प्रकरणे : गुन्हेगारीच्या यादीत दहशतवादाची शंभराहून अधिक प्रकरणे आहेत. यात फरार दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, जमात-ऊल-मुजाहिद्दीनचे सदस्य, छत्तीसगढमध्ये २०१३ मध्ये अपहरणाशी संबंधित २८ घटनांत अटक करण्यात आलेले पीपल्स लिबरेशन फ्रंट आॅफ इंडियाचे सदस्य, खून, लूट, जाळपोळ आणि खंडणीची प्रकरणे आणि डेमोक्रॅ टिक फ्रंट आॅफ बोडोलँड या संघटनेच्या गनिमांचाही समावेश आहे.
आर्थिक गुन्हे, दहशतवाद, तस्करीतील ६ हजारांहून अधिक आरोपींवरही पाळत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 12:52 AM