शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

तो झाला वेडा पिसा...विवाहित महिलेवर जबरदस्ती; स्वतःच्या हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 3:07 PM

Suicide Attempt : दीपक संजय पाटील (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. तो जळगाव जिल्ह्यातील येनगाव (बोदवड) येथील रहिवासी आहे.

ठळक मुद्दे महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून त्याने आरोपी पाटील विरुद्ध आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

नागपूर : विवाहित महिलेच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या एका तरुणाने स्वतःच्या हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही घटना घडली.

दीपक संजय पाटील (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. तो जळगाव जिल्ह्यातील येनगाव (बोदवड) येथील रहिवासी आहे.  बेलतरोडीतील दोन मुलांची आई असलेल्या ३५ वर्षाच्या एका महिलेसोबत त्याची फेसबुकवर ओळख झाली. नंतर टॅक्सी ड्रायव्हर असलेला पाटील गेल्यावर्षी नागपुरात आला. त्याने महिलेशी संपर्क साधून तिचा पत्ता जानून घेतला आणि तिच्या घरी पोहोचला. तेथे त्याने जाणे-येणे वाढवल्याने या दोघांचे सूत जुळवले. बरेच दिवस त्यांचे अनेतिक संबंध गुपचूप सुरु होते. ३० जुलै २०२० ला त्याने या महिलेला जळगावला पळवून नेले. महिलेच्या नवऱ्याने बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोबाईल वरून माग काढून जळगाव गाठले. तेथे त्यांनी महिलेला विचारपूस केली असता मी स्वमर्जीने पाटीलसोबत आली आणि आता मला परत यायचे नाही. पाटील सोबतच राहायचे आहे, असे तिने सांगितले. त्यामुळे पोलीस हात हलवत परत आले. दरम्यान, तब्बल सात महिने हे दोघे जळगावला पती-पत्नी सारखे राहत होते. नंतर त्यांच्यात खटके उडाल्याने तीन आठवड्यापूर्वी ही महिला नागपुरात आपल्या घरी परतली. मोठ्या मनाच्या नवऱ्यानेही तिला स्विकारले आणि घरी ठेवून घेतले. सर्व सुरळीत असताना आता तीन दिवसांपूर्वी पाटील पुन्हा नागपुरात परतला. त्याने महिलेचे घर गाठले. तेथेच दोन दिवस मुक्काम ठोकला आणि तिला सोमवारी दुपारी आपल्या सोबत जळगावला घेऊन जाण्यासाठी जबरदस्ती करू लागला. महिलेने नकार दिला. त्यामुळे त्याने तिच्याशी वाद घालून तिच्या घरातील भाजी कापण्याच्या चाकूने आपल्या दोन्ही हाताच्या नसा कापून घेतल्या. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केली. तर तिच्या पतीने बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार विजय आकोत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचून जखमी आरोपी पाटीलवर उपचार करून घेतले. त्यानंतर महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून त्याने आरोपी पाटील विरुद्ध आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.... हिच्या वाचून करमेना !

पोलिसांनी आरोपी पाटीलला विचारणा केली असता त्याने 'हिच्या वाचून मी जगू शकत नाही. मला करमतच नाही,' असे सांगितले. पोलिसांनी त्याची कशीबशी समजूत घालून त्याला जळगावला पाठवून दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल