मीरारोड - साखरपुडा झाल्यावर भावी पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेऊन नंतर लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध काशीमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर त्या तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचे आई,वडील व भावास सुद्धा आरोपी केले आहे .काशीमीरा पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचं गोरेगावच्या २६ वर्षीय तरुणाशी एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून लग्न जुळले. २० फेब्रुवारी रोजी दोघांचा साखरपुडा झाला, पण नंतर कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने लग्न राहिले. परंतु साखरपुडा झाला असल्याने दोघं एकमेकांना भेटत. लॉकडाऊन काळात तर तरुण आपल्या भावी पत्नीच्या घरीच महिनाभर येऊन राहिला. त्यात दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. परंतु नंतर मात्र त्या तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये वाद होऊ लागला.
पीडित तरुणी गोरेगाव येथे तरुणाच्या घरी त्याच्या आई वडिलांना विचारण्यास गेली असता तिला तेथे मारहाण करण्यात आली. त्या नंतर पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचे आई, वडील व भावास देखील आरोपी करण्यात आले आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ
लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ
अॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह
कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार
धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती
पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ
नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला
जुन्या वैरातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, एकजण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी