शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

... तो पोटात चाकू घेऊन पोहचला पोलीस ठाण्यात, बघाबघीवरुन झाला वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 9:44 PM

रागाने बघितल्यावरून दोन गटांत वाद, कपिलनगरात राडा, तीन जखमी

ठळक मुद्देरविवारी रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान कपिलनगरात ही घटना घडली. कुणाल उर्फ लकी प्रताप वाघमारे आणि कल्पेश उर्फ दादा सूरज राबा (वय १९) अशी या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या अन्य दोघांची नावे आहेत

नागपूर : रागावून बघत असल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणांच्या दोन गटांत वाद झाला. त्यानंतर, भेटायला बोलावण्याचा बहाना करून ८ ते १० आरोपींनी तिघांवर हल्ला केला. त्यातील एकाला चाकूने भोसकून जबर जखमी केले. विनय सूरज राबा (वय १८) असे त्याचे नाव आहे. विनय पोटात चाकू घेऊन बराच वेळपर्यंत तो ईकडे तिकडे फिरत होता अन् त्याच अवस्थेत तो कपिलनगर पोलीस ठाण्यात पोहचला. ते पाहून काही वेळेसाठी पोलिसही हादरले.

रविवारी रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान कपिलनगरात ही घटना घडली. कुणाल उर्फ लकी प्रताप वाघमारे आणि कल्पेश उर्फ दादा सूरज राबा (वय १९) अशी या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या अन्य दोघांची नावे आहेत. कल्पेशने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सलमान शेख, जावेद, राजिक उर्फ राजा आणि समशेर यांच्यासोबत विनय आणि कल्पेशची दोन दिवसांपासून धुसफूस सुरू होती. तू आमच्याकडे रागाने का बघतो, अशी विचारणा करून, आरोपींनी वाद वाढविला होता. रविवारी रात्री १०.३० वाजता आरोपी सलमानने कल्पेशला याबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने कपिलनगरातील एका मैदानात बोलवले. त्यानंतर, कल्पेश त्याचा भाऊ विनय आणि कुणाल वाघमारे नामक एका मित्राला घेऊन गेला. तेथे आरोपी सलमान, समशेर, जावेद, इम्रान, समीर अली, शाहरुख पठाण, मोहम्मद राजिक, साहिल शेंडे, आकाश केतवास आणि त्यांचे साथीदार होते. त्यांनी कल्पेश, तसेच त्याचा भाऊ आणि मित्राला ‘बहोत गरम चल रहे क्या’ म्हणत मारहाण केली. आरोपींनी विनयला चाकूने भोसकले. ते पाहून कल्पेश आणि कुणाल मदतीला धावले असता आरोपींनी त्यांच्यावरही चाकूहल्ला केला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपींना कसेबसे आवरले. यानंतर, पोलिसांना माहिती देण्यात आली. कपिलनगरचे ठाणेदार अमोल देशमुख आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धावले. तर, ईकडे विनय, कल्पेश तसेच कुणाल हे तिघे जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात पोहचले. विनय पोटात चाकू घेऊन तशाच अवस्थेत ठाण्याच्या आवारात फिरत होता. एम्बुलन्स आल्यानंतर त्याला बसवून रुग्णालयात नेण्यात आले.

प्रचंड तणाव

या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. जमाव पोलीस ठाण्याच्या आवारात पोहचला. पोलिसांनी संतप्त जमावाची समजूत काढली. त्यानंतर आरोपींच्या घराकडे मोठा बंदोबस्त लावण्यात आला. पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. 

दरम्यान, पोलिसांनी रात्रभर धावपळ करून १४ पैकी दोन अल्पवयीन आरोपींसह सहा जणांना ताब्यात घेतले. त्यातील चौघांना एपीआय श्रीकांत संघर्षी यांनी न्यायालयात हजर करून त्यांचा ११ जूनपर्यंत पीसीआर मिळवला. फरार आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल