जळगाव : मोबाईल हरविल्याची एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली, त्यानंतर चिंचोली येथे दुचाकीत पेट्रोल भरायला जात असतानाच दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने त्यात प्रितेश सुरेश रायपुरे (२८, रा.सुप्रीम कॉलनी, मुळ रा.तांदळवाडी, ता.रावेर) हा तरुण जागीच ठार झाला तर दुसºया दुचाकीवरील विकास चंपालाल बारेला हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी दुपारी विमानतळाच्यासमोर झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रितेश सुरेश रायपुरे या तरुणाचा हरविला. याबाबत त्याने बुधवारी साडे बारा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली, त्यानंतर शहरात पेट्रोल मिळत नसल्याने चिंचोली येथे दुचाकीत (क्र.एमएच १९ एवाय ८६२६)पेट्रोल भरण्यासाठी निघाला. दुपारी एक वाजता विमानतळाजवळ समोरुन भरधाव वेगाने येणाºया विकास बारेला याची दुचाकी प्रितेशच्या दुचाकीवर आदळली. दोघंही रस्त्यावरुन फेकले गेले. यात प्रितेशचा डोळा बाहेर आला तर डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच गतप्रात झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, इमरान सय्यद, निलेश पाटील, मुदस्सर काझी, असीम तडवी व कुसुंबा येथील पोलीस पाटील राधेश्याम चौधरी यांनी अशांनी जखमीला गोदावरी रुग्णालयात रवाना केले तर प्रितेशला मालवाहू रिक्षातून जिल्हा रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. हवालदार रतिलाल पवार व सदानंद नाईक यांनी पंचनामा केला व शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
प्रितेश उच्चशिक्षीतप्रितेश हा अविवाहित होता. त्याचे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले होते. पुणे येथे आॅर्डनन्स फॅक्टरी व नंतर टाटा मोटर्स या कंपनीत त्याने नोकरी केली. काही दिवसापूर्वी त्याला कुटुंबाने जळगावात बोलावून घेतले होते. शिवाजी नगरातील वर्कशॉपमध्ये तो कामाला जात होता. मोठा भाऊ निलेश हा गाडेगाव येथील सुप्रीम कंपनीत सुपरवायझर आहे. त्याच्या पश्चात आई सिताबाई, भाऊ निलेश, वहिणी नेहा, विवाहित बहिणी रुपाली संजय वाल्हे, सोनाला संजय वाल्हे असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप हजारे व हवालदार रतिलाल पवार करीत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पारनेरचे पाच नगरसेवक पुन्हा शिवबंधनात; मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची घेतली भेट
पारनेरच्या पाच नगरसेवकांना अजित पवारांनी अखेर मिलिंद नार्वेकरांकडे सोपविले
1962चे युद्ध हरल्यानंतर नेहरू, यशवंतराव देखील सीमेवर गेले होते; शरद पवारांकडून मोदींची स्तुती
मुंबई सावरली! आज दिवसभरात केवळ ७८५ नवे रुग्ण सापडले
एकाच दिवशी भाजपच्या तीन आमदारांना कोरोना; दोन पुण्यातील
मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला? शरद पवारांनी दिले भाजपला उत्तर