शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

स्वत:वर ब्लेडनं वार करुन फौजदारास सत्तूरच्या मुठीनं मारुन केलं जखमी

By विलास जळकोटकर | Published: July 25, 2023 7:15 PM

पोलिसांशी धक्काबुक्की : दोघा गुन्हेगारी भावांचा पोलिस ठाण्यात राडा

सोलापूर : स्थानबद्धतेची शिक्षा भोगलेल्या गुन्हेगारानं त्याच्या भावाच्या मदतीनं पोलीस ठाण्यात येऊन स्वत:वर ब्लेडनं वार करीत फौजदारांना सत्तुरच्या मुठीनं मारुन जखमी केलं. पोलिसांशी झटापट करीत राडा केला. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा सिनेस्टाईल थरार घडला. या प्रकरणी फौजदार सचिन माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरुद्ध  गुन्हा नोंदला आहे.

मुकेश बोधीवाले व गंगाराम बोधीवाले (रा. नळ बझार, लष्कर सोलापूर) असे गुन्हे नोंदलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलीस सूत्रांनुसार सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास सदर बझार पोलिस ठाण्याच्या बाहेर आरडाओरडा सुरु असल्याने फिफर्यादी माळीसह सर्व सहकारी बाहेर आले. यावेळी मुकेश उर्फ मुक्या किसनसिंग बोधीवाले व त्याचा भाऊ गंगाराम उर्फ गंग्या बोधीवाले हे दोघे अमर माने याने आम्हाला मारहाण केली आहे त्याच्याविरुद्ध तक्रार घ्या म्हणून गोंधळ घालत होते. तक्रार घेण्याची तयारी करीत असताना आक्रमक होत त्यातील मुकेश याने खिशातून ब्लेड काढत स्वत:च्या हातावर वार करुन घेतला. त्याला पोलिस रोखण्यासाठी गेले असता पँटमध्ये खोचलेले कोयात काढून फिरवत पाठीमागच्या मुठीनं फौजदार माळी यांच्या हातावर मारले. त्याला ताब्यात घेताना पोलिसांनाही धक्काबुक्की केली. टेबलावरील कागदपत्रे फेकली. शेवटी दोघांनाही बळाचा वापर करुन ताब्यात घेण्यात आले. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला करीत आहेत.शासकीय कामात अडथळास्थानबध्दतेची शिक्षा भोगून आलेला आरोपी गंगाराम याने पोलिसांना धक्काबुक्की केली. पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सरतापे यांच्या छातीत जोराचा ठोसा मारला. यात सरतापे हे खाली पडल्याने त्यांच्या पाठीला मुक्का मार लागला. यानंतर या दोघांनी पोलीस ठाण्यातील टेबलावरील कागदत्रे अस्ताव्यस्त फेकून देऊन शासकीय कामात अडथळा केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :Policeपोलिस