काँग्रेस आमदाराला जिवे मारण्याच्या धमक्या, हितचिंतक बनून सांगितली सुपारीची किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 08:48 PM2022-07-02T20:48:01+5:302022-07-02T20:53:20+5:30
Threatening Case : महिला आमदार यांनी सांगितले की, आतापर्यंत पोलिसांनी त्यांची सुरक्षा वाढवली नाही.
यमुनानगर : यमुनानगरच्या सधौरा येथील काँग्रेसआमदार रेणू बाला यांना परदेशी मोबाईल नंबरवरून धमकीचा कॉल आल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदाराला कोणीतरी परदेशी मोबाईल क्रमांकावरून फोन करून तिला हितचिंतक असल्याचे सांगून तिला मारण्यासाठी 25 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे सांगितले. यानंतर आमदाराने या घटनेची पोलिसात तक्रार दिली आहे.
यमुनानगरमध्ये याआधीही परदेशी मोबाईल क्रमांकाद्वारे खंडणी मागितल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. यावेळी साधौरातील काँग्रेस आमदार रेणू बालाही निशाण्यावर आल्या आहेत. 25 जून रोजी आमदाराला एका परदेशी मोबाईल क्रमांका वरून फोन आला, ज्यामध्ये समोरच्या व्यक्तीने आपण आपल्या हितचिंतकांशी बोलत असल्याचे सांगितले आणि आमदाराला मारण्यासाठी 25 लाख रुपयांचे सुपारी देण्यात आली असल्याचे सांगितले आहे. या फोनची माहिती आपण तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षक मोहित हांडा यांना दिली, असे आमदार म्हणाल्या. त्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. महिला आमदार यांनी सांगितले की, आतापर्यंत पोलिसांनी त्यांची सुरक्षा वाढवली नाही.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर हरियाणा सरकारवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या की, त्या विरोधी पक्षनेते असल्या तरी जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर राज्यातील जनतेचे काय होणार, असा टोलाही त्यांनी लगावला.