संत कबीर नगर - उत्तर प्रदेश येथील संत कबीरनगर जिल्ह्यातून कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनदरम्यान एक दुःखद बातमी समोर आली आहे. येथील लॉकडाऊनदरम्यान, औषध आणायला गेलेला माणूस पोलिसांना पाहून इतका घाबरला की त्याने पोलिसांच्या लाठ्यांपासून बचाव करण्यासाठी नदीत उडी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अनेक तासांच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढले, परंतु तोपर्यंत त्याने अखेरचा श्वास सोडला होता. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. या प्रकरणात अप्पर पोलिस अधीक्षक असित श्रीवास्तव म्हणाले की, ही बाब कळविण्यात आली आहे, सीओ पातळीवरून तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील धनघटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडगो गावचा रहिवासी असलेला 50 वर्षीय शिवकुमार बुधवारी सकाळी गोरखपूर जिल्ह्यातील सिकरीगंज गावी औषध घेण्यासाठी जात होता. सिकारीगंज सीमेआधी पोलिस कर्मचार्यांची नजर त्याच्यावर पडली. पोलीस शिवकुमारच्या दिशेने जाताना तो घाबरुन पळायला लागला आणि सुटका करण्यासाठी बासखारी घाटातील कुआनो नदीत उडी मारली. खोल नदीमुळे लाखो प्रयत्न करूनही तो नदी पार करु शकला नाही आणि बुडाला.पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविलापोलिसांनी नाविकांच्या मदतीने शिवकुमारला शोधले आणि कुटुंबीयांना त्याविषयी माहिती दिली. माहिती मिळताच कुटुंबीयांनी शिवकुमारला सीएचसी मालुली येथे नेले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. यासंदर्भात अप्पर पोलिस अधीक्षक असित श्रीवास्तव म्हणाले की, ही बाब कळविण्यात आली आहे, सीओ पातळीवरून चौकशी सुरू आहे.
आणखी महत्वाच्या बातम्या वाचा...
Palghar Mob Lynching : आणखी तीन पोलिसांचे निलंबन तर ३५ जणांची तडकाफडकी बदली
खळबळजनक! प्रेयसीच्या घराच्या उंबरठ्यावर प्रियकराची हत्या; संपूर्ण गाव गेलं हादरून
लॉकडाऊनमध्ये कुटुंबावर आली बेताची स्थिती, कलहातून बेरोजगार मुलाने केली वडिलांची हत्या
Lockdown : जेवण वाटपाच्या बहाण्याने टाकला ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लुटले कोटी रुपये