शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

दाढी करायला गेला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 12:07 PM

पोलिस पथकाने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणारी व्हँनमध्ये बसून वस्तीत प्रवेश केला.

मुंबई / कल्याण :  कल्याण जवळील आंबिवलीतील इराणी वस्तीत एका भामट्याला पकडण्यासाठी मुंबईतील डीएननगरातील पोलिस आले असता, आरोपीच्या नातेवाइकांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. पोलिस आणि आरोपीच्या नातेवाइकांमध्ये झटापट झाली. अखेरीस पोलिसांनी इराणी भामट्याच्या मुसक्या आवळल्या. अटक केलेल्या आरोपीचे नाव फिरोज खान असे आहे.

फिरोजला पकडण्यासाठी पोलिस पथकातील महिला पोलिसाने बुरखा परिधान करून वस्तीत प्रवेश केला. वस्तीतील एका सलूनमध्ये फिरोज दाढी करीत होता. बुरखाधारी महिला पोलिसाने दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाला फिरोज सलूनमध्ये असल्याची माहिती दिली.

पोलिस असल्याची बतावणी करून फिरोज खान याने एका इसमाला एक लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना मुंबईतील अंधेरी परिसरात घडली होती. याप्रकरणी अंधेरी डीएननगर पोलिस ठाण्याच्या पाेलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी काही ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता, चोरटा हा अनेक गुन्ह्यात फरार असल्याची माहिती उघड झाली. चोरटा फिरोज खान याला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. तो आंबिवली येथील इराणी वस्तीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. त्याठिकाणी पोलिसांचे एक पथक वस्तीच्या आसपास दबा धरून बसले. 

पोलिस पथकाने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक करणारी व्हँनमध्ये बसून वस्तीत प्रवेश केला. फिराेजने पळ काढण्याचा प्रयत्न केला. तसेच फिरोजच्या नातेवाइकांनी पोलिसांना रोखण्याकरिता पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. पोलिस आणि फिरोजच्या नातेवाइकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी नातेवाइकांच्या प्रतिकाराला न जुमानता अखेरीस फिरोजच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला मुंबईला आणले. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फिरोज हा सराईत गुन्हेगार आहे.

इराणी वस्ती पुन्हा रडारवर   गेल्या अनेक वर्षांपासून इराणी वस्तीत चोरट्यांचे वास्तव्य होते. त्याठिकाणी पोलिसांनी अनेक वेळा कोम्बिंग ऑपरेशन केले आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिस गेले की, त्यांच्यावर जीवघेणे हल्ले होतात.  कधी दगडफेक केली जाते. कधी सामूहिक हल्ला केला जातो. कधी पोलिसांना चावा घेऊन दुखापत केली जाते. एकदा तर पोलिसांच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न झाला होता.  २००८ मध्ये दोन आरोपींना घेऊन जात असताना जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यावेळी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात दोन आरोपींचा मृत्यू झाला होता. फिराेज खानच्या अटकेमुळे इराणी वस्ती पुन्हा पोलिसांच्या रडारवर आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी