राजस्थानमधील बुंदीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकाला शिकवायला सांगितल्यावर शिक्षक संतापला आणि त्याने थेट मुख्याध्यापकाचं डोकच फोडल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. अशोक कुमार असं या मुख्याध्यापकाचं नाव असून त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या असल्यामुळे मुख्याध्यापक अशोक कुमार यांनी शिक्षकांना मुलांना शिकवण्यास सांगितले होते.
दबलाना पोलीस स्टेशन हद्दीतील सरसौद उच्च माध्यमिक विद्यालयातील ही घटना आहे. शाळेत मुख्याध्यापकांनी शिक्षक जय किशन यांना वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यास सांगितले होते. मुख्याध्यापक अशोक कुमार यांच्या आदेशाने शिक्षक जय किशन चौधरी यांना राग आला आणि त्यांनी त्यांचे डोके फोडले. जखमी अवस्थेत इतर शिक्षकांनी मुख्याध्यापकांना जिल्हा रुग्णालयात नेले जेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या संपूर्ण प्रकरणात मुख्याध्यापक अशोक कुमार यांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध दबलाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानंतर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. सध्या जखमी मुख्याध्यापक जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल आहेत. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला कर्नाटकातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाला शेकडो विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केली होती.
मुख्याध्यापकावर शाळेतील विद्यार्थिनीचा छळ केल्याचा आरोप होता. हे प्रकरण कर्नाटकातील श्रीरंगपट्टणातील आहे जिथे मुख्याध्यापकाने वसतिगृहातील अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केले. याबाबत अल्पवयीन मुलीने वसतिगृहातील इतर विद्यार्थिनींना माहिती दिली होती, त्यानंतर विद्यार्थिनींनी त्याला बेदम मारहाण केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"