अलिबाग : महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे-गोरे हत्या प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सोमवारी आरोपींचे वकील आपले म्हणणे न्यायालयात मांडणार होते; परंतु त्यांनी म्हणणे मांडण्याकरिता पुढील तारीख मागून घेतली आहे.
त्यामुळे आता या खटल्याची सुनावणी गुरुवार, ६ जून रोजी होणार असल्याची माहिती या खटल्यातील विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणात समावेश असलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी अभय कुरंदकर, राजेश पाटील व आणखी चार संशयित आरोपींविरुद्ध न्यायालयात ६५० पानी आरोपपत्र विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी दाखल केले आहे. या ६५० पानांच्या आरोपपत्रात अपहरण, हत्येचा कट, खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संशयित आरोपींवर ठवण्यात आला आहे.
दरम्यान, कुरुंदकर व त्याच्या साथीदारांनी बिंद्रे-गोरे यांची कट करून हत्या केली आहे. पुरावा नष्ट करण्याकरिता मृतदेह खाडीत फेकून दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. खोटी कागदपत्रे सादर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याने संशयितांना कठोर शिक्षा व्हावी, असे विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी आपल्या युक्तिवादात नमूद केले आहे.
६५० पानांचे आरोपपत्र दाखलया हत्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी अभय कुरंदकर, राजेश पाटील व अन्य चार संशयित आरोपींविरुद्ध न्यायालयात ६५० पानी आरोपपत्र विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी दाखल केले आहे.