लुधियाना : सायबर भामटे काेणत्या थराला जातील, याची कल्पनाही करता येणार नाही. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने बनावट सुनावणी करून अटकेची भीती दाखवून वर्धमान समूहाचे अध्यक्ष एस.पी. ओसवाल (८२) यांना तब्बल ७ काेटी रुपयांनी गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर पाेलिसांनी आंतरराज्यीय टाेळीची ओळख पटविली असून, दाेन जणांना गुवाहाटी येथून अटक केली. आराेपींकडून सुमारे ६ काेटी रुपये परत मिळविण्यात यश आले आहे.
एस.पी. ओसवाल यांना २०१० मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सायबर भामट्यांनी काही उद्याेगपतींना अडकविण्यासाठी जाळे विणले हाेते. ओसवाल यांनी लुधियाना पाेलिसांकडे फसवणुकीची तक्रार केली. त्यानंतर, पाेलिसांनी बँक खात्यांचा तपास करून या टाेळीचा म्हाेरक्या अतनू चाैधरी आणि आनंद चाैधरी यांना गुवाहाटी येथून अटक केली.
फसवणुकीचा धंदा कशामुळे? nआराेपींचा व्यवसाय काेराेना काळात ठप्प झाला. त्यांच्यावर ६ काेटीचे कर्जही झाले. त्यानंतर, त्यांनी सायबर फसवणुकीची याेजना आखली.nत्यात आणखी ७ जणांना सामील करून घेण्यात आले.
अशी केली ओसवाल यांची फसवणूक एका भामट्याने माेबाइलवर काॅल करून आपण दिल्लीतून बाेलत असल्याचे सांगितले. सर्वाेच्च न्यायालयाने त्यांच्या नावे अटक वाॅरंट जारी केला आहे, तसेच मालमत्ता जप्तीची भीती दाखविली. ईडी, सीबीआय, तसेच कस्टम विभागाचाही दाखला त्यांना देण्यात आला. दुसऱ्या दिवशी सरन्यायाधीश सुनावणी करतील, असे सांगितले.
दुसऱ्या दिवशी ऑनलाईन सुनावणी सुरू झाली. सर्वाेच्च न्यायालयाचा बनाव रचण्यात आला. न्यायाधीश दिसत नव्हते. मात्र, त्यांचा आवाज येत होता. त्यांनी थेट ओसवाल यांची संपत्ती हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले, अन्यथ अटक करा, असे सांगितले. अटक वाॅरंटही पाठविला. ओसवाल यांनी वाटाघाटी सुरू केल्या आणि तिथेच ते फसले. वेगवेगळ्या कायद्यांचा धाक दाखवून ओसवाल यांच्याकडून काेट्यवधी रुपये वसूल केले.
बॅंक कर्मचारी सामील?nया दाेघांच्या बँक खात्यात ७ काेटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले हाेते. nत्यापैकी ४ काेटी रुपये अतनू याच्या, तर ३ काेटी रुपये आनंद याच्या खात्यात जमा झाले हाेते. nया प्रकरणात आसाममधील बँकेचे कर्मचारीही सामील असण्याचा संशय पाेलिसांना आहे.