शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकताच अंसी कबीरच्या आईनं केला आत्महत्येचा प्रयत्न; थोडक्यात बचावली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 2:47 PM

अंसीचा अपघातात मृत्यू झाल्याचं कळताच तिचे नातेवाईक अंसीच्या घरी जाण्यास निघाले. अंसीचे नातेवाईक जवळच राहतात.

केरळ कोच्ची येथे सोमवारी झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन युवतींचा मृत्यू झाला. या मृत युवतींमध्ये मिस केरळ २०१९ ची विजेती अंसी कबीर(Ansi Kabeer) आणि उपविजेती डॉ. अंजना शाहजहा हिचा समावेश होता. एका दुर्देवी अपघातात दोघींने प्राण गमावला. अंसी आणि अंजनाच्या अचानक एक्झिटनं चाहत्यांना मोठा धक्का बसला. इतक्या कमी वयात दोघी युवतींनी जगाचा निरोप घेतला.

अंसी कबीरच्या मृत्यूची बातमी समोर येताच तिची आई हे दु:खं सहन करु शकली नाही. त्यामुळे आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. अंसीच्या आईने झोपेच्या गोळ्या खात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच उपचार मिळाल्याने अंसीच्या आईचा जीव बचावला. अंसीच्या आईची तब्येत सध्या स्थिर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरी बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेली असताना नातेवाईकांनी अंसीच्या आईला पाहिलं त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले.

अंसीचा अपघातात मृत्यू झाल्याचं कळताच तिचे नातेवाईक अंसीच्या घरी जाण्यास निघाले. अंसीचे नातेवाईक जवळच राहतात. त्यामुळे अंसीच्या आईचं सांत्वन करण्यासाठी ते घरी पोहचले. तेव्हा घरातील दरवाजा आतून बंद होता. अनेकदा बेल वाजवली पण कुणीच उघडलं नाही. तेव्हा खिडकीतून पाहिलं असता अंसीची आई जमिनीवर पडल्याचं दिसून आलं. कसंतरी दरवाजा उघडून नातेवाईक आतमध्ये गेले त्यांनी अंसीच्या आईला रुग्णालयात नेले. मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून आईला तो धक्का सहन झाला नाही म्हणून तिने आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं असं नातेवाईक म्हणाले.

आता जायची वेळ आलीय...

अंसी कबीर ही २०१९ मध्ये मिस केरळा बनली होती. त्यानंतर २०२१ मध्ये ती मिस साउथ इंडिया बनली होती. अंसी तिरुवनंतपुरम येथे राहणारी होती. तर दुसरीकडे २०१९ मध्ये मिस केरळ रनरअप राहिलेली डॉ. अंजना शजान ही मॉडेलिंग करत होती. दोघींच्या अचानक झालेल्या मृत्यूनं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अंसी कबीर हिच्या मृत्यूनंतर आता तिची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. अंसी कबीरनं(Ansi Kabeer) अलीकडेच तिच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, आता जायची वेळ आली आहे. अंसीने हे बाहेर फिरण्याच्या हेतूने लिहिलं होतं. परंतु अंसीची ही अखेरची पोस्ट ठरेल असं स्वप्नातही कुणाला वाटलं नाही.