शनिवारी उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमधून हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. जेथे सीआरपीएफ जवानानं पत्नी आणि दोन मुलांवर गोळी झाडली. त्यानंतर सीआरपीएफ जवाननेही स्वत: ची आत्महत्या केली. ही घटना थरवईच्या परिल्ला ग्रुप सेंटरची आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारीही आले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. विनोद असे मृत सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. त्याने पत्नी विमला, मुलगा संदीप आणि मुलगी सिमरन यांना गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर त्याने आपले प्राणही संपवले.त्याचवेळी, प्रयागराजमध्येच सामूहिक हत्येच्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली होती, ज्यामध्ये पीडित कुटुंबातील मुलाचे एका महिलेबरोबर अवैध संबंध ठेवल्याचा निषेध केल्याने संपूर्ण कुटुंब संतप्त झाले होते. नंतर मुलाने संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. आतापर्यंतच्या तपासात हे उघड झाले आहे की, पीडितेच्या कुटूंबाचा मुलगा हा खुनाचा सूत्रधार आहे.इतकेच नाही तर मारेकरी मित्राला 8 लाख रुपयात सुपारी देऊन घरातील आई, वडील, बहीण आणि पत्नीची हत्या केली. या घटनेत पोलिसांनी आतिश आणि अनुज श्रीवास्तव यांना अटक केली. आतिशने त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा जीव घेतला आहे. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. धुमगंज पोलीस स्टेशन परिसरातील प्रीतम नगर भागात घटनेनंतर दहशतीचे वातावरण आहे.
Coronavirus : लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनी पोलिसांवर केला जीवघेणा हल्ला
Coronavirus : अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त आरोपींची काढण्यात आली होती धिंड