शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

हृदयद्रावक! आईने गरोदर मुलीची केली हत्या, नातेवाईकांना विहिरीत ढकलण्यासाठी दिली सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 7:21 PM

Murder Case : या हत्येतील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. मृत महिला तेलंगणाची रहिवासी होती, मात्र मृतदेह चंद्रपूरमध्ये आढळून आला.

महाराष्ट्रातील चंद्रपूरमधून हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे आईने सुपारी देऊन गरोदर मुलीची हत्या केली. आरोपींनी हत्येला आत्महत्येसारखे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करू शकले नाहीत. या हत्येतील सर्व आरोपींना पोलिसांनीअटक करून तुरुंगात पाठवले आहे. मृत महिला तेलंगणाची रहिवासी होती, मात्र मृतदेह चंद्रपूरमध्ये आढळून आला.पतीपासून विभक्त राहत असल्याने आईनेच आपल्या गर्भवती मुलीची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. समाजात कोणतीही बदनामी होऊ नये म्हणून त्याने आपल्या दोन नातेवाईकांना मारण्याची सुपारी दिली आणि मुलीला विहिरीत ढकलले. त्यानंतर त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव रचला आहे. पोलिसांनी संशयावरून त्यांची कडक चौकशी केली असता हत्येचा कट उघड झाला.असा खुनाचा कट उघडकीस आला होतातेलंगणात राहणारी महिला महाराष्ट्रात येऊन आत्महत्या का करेल असा संशय पोलिसांना होता. या संशयाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. मृत महिलेच्या नातेवाइकांची कसून चौकशी केली असता, तिचे नातेवाईक दाम्पत्य घटनास्थळाजवळील गावात राहत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेच्या आईने तिचे नातेवाईक सिन्नू अजमेरा आणि शद्रा यांना हत्येची सुपारी दिली होती. ३० हजार रुपयांना हा सौदा ठरला आणि 5 हजार रुपये अॅडव्हान्स देण्यात आले. सुपारी घेणाऱ्या दाम्पत्याने ठरलेल्या कालानुसार प्रसूतीचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेला निर्जनस्थळी नेले होते.महिलेच्या डोक्यात दगड घातलापोलिस निरीक्षक राहुल चौहान यांनी सांगितले की, महिलेच्या डोक्यावर दगडाने जबर मार लागला आणि ती खाली पडली. तिला पुन्हा विहिरीत खाली फेकले. खून केल्यानंतर सर्वजण घटनास्थळावरून पसार झाले. या खुनात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसpregnant womanगर्भवती महिलाArrestअटक