पाटणा : बिहारमध्ये १ ऑक्टोबरपासून होणाऱ्या कॉन्स्टेबल भरती परीक्षेत हायटेक कॉपी घोटाळ्याची तयारी सुरू होती. परीक्षेच्या तीन दिवस आधी पोलिसांनी बेगुसराय येथे सूत्रधारासह ५ जणांना अटक करून याचा पर्दाफाश केला. त्यांच्याकडून ३३ वॉकीटॉकी, १६ ब्लूटूथ उपकरणे, ६ मोबाइल, कॉन्स्टेबल भरती परीक्षेची १३६ प्रवेशपत्रे व २ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
अशीच एक कारवाई छपरा येथे करत पोलिसांनी फॉर्च्युनर वाहनातून १० वॉकी-टॉकी, ३० ब्लूटूथ, २ मोबाइल, २८ अँटी जॅमर, ५५ घड्याळाच्या बॅटरी, ४ हॉकी स्टिक व ३० केबल चार्जर जप्त केले आहेत. सुनील कुमार, उमेदवार गुलशन कुमार, रामबाबू कुमार, अभय कुमार व बिट्टू कुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुनील व विवेक हे भरतीसाठी कोचिंग संस्था चालवतात. विवेकने घटनास्थळावरून पळ काढला. सुनील आणि विवेक हे बेगुसराय आणि सहरसा येथे पकडलेल्या टोळीचे सूत्रधार आहेत. (वृत्तसंस्था)
असा होता प्लॅन...nचप्पलमध्ये ब्लूटूथ डिव्हाइस दडवण्यात येते. nया डिव्हाइसमध्ये सिम आहे.nपरीक्षार्थीच्या कानात मायक्रो इअरपीस बसवला जातो.nते वॉकी टॉकीशी जोडलेले आहे. प्रश्नपत्रिका सोडवणारा वॉकी टॉकीसह परीक्षा केंद्रापासून फक्त ५०० मीटरच्या अंतरावर बसतो
रेट ५ ते सहा लाखया घोटाळ्यात १३६ परीक्षार्थींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या बदल्यात सुनील एका उमेदवाराकडून ६० हजार ॲडव्हान्स आणि नंतर ५ ते सहा लाख रुपये घेतो.