शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

हायअलर्ट! अमृतसर सीमा परिसरात सापडला RDXने भरलेला टिफिन बॉम्ब 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 3:40 PM

Tiffin bomb filled with RDX found : पोलिसांना हा टिफिन बॉम्ब पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अमृतसरच्या डालेके  गावाजवळ सापडला आहे.

ठळक मुद्देबीएसएफ आणि पंजाब पोलीस कर्मचारी संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहेत.अमृतसरच्या सीमा भागात ड्रोनद्वारे दोन किलो आरडीएक्सने भरलेला टिफिन बॉम्ब पाकिस्तानकडून फेकण्यात आला.डालेके गावाजवळ बॉम्ब सापडला, बीएएसएफ आणि पंजाब पोलीस संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. 

अमृतसर/चंदीगड - पाकिस्तानने पुन्हा सीमेवर घृणास्पद कृत्य केले आहे. १५ ऑगस्ट रोजी पंजाबमध्ये दहशत माजवण्याचा कट होता. अमृतसरच्या सीमा भागात ड्रोनद्वारे दोन किलो आरडीएक्सने भरलेला टिफिन बॉम्ब पाकिस्तानकडून फेकण्यात आला. या बॉम्बने पंजाबमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मोठा स्फोट घडवण्याचा कट रचला गेला होता. मात्र, पोलिसांनी हा कट उधळून लावला आहे. पोलिसांना हा टिफिन बॉम्ब पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अमृतसरच्या डालेके  गावाजवळ सापडला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.पंजाब पोलिसांकडून दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. बीएसएफ आणि पंजाब पोलीस कर्मचारी संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी स्वातंत्र्यदिनी पंजाबमध्ये मोठा बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते.

डालेके गावाजवळ बॉम्ब सापडला, बीएएसएफ आणि पंजाब पोलीस संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहेत.  बॉम्ब ड्रोनद्वारे सीमेपलीकडून फेकण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पंजाबचे डीजीपी दिनकर गुप्ता यांनी चंदीगडमध्ये सांगितले की, त्यात दोन किलो आरडीएक्स आणि स्विच यंत्रणा असलेला टाइम बॉम्ब आहे. यात स्प्रिंग मेकॅनिझम, मॅग्नेटिक आणि 3 डेटोनेटर देखील मिळाले आहेत. अशी शक्यता आहे की, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना काही मोठ्या दहशतवादी घटना घडवण्याच्या तयारीत होत्या.आरडीएक्स आणि टिफिन बॉम्ब मिळाल्यानंतर गावातील लोकांत भीती निर्माण झाली आहे. जर ड्रोनमधून खाली टाकताना हा बॉम्ब इथे फुटला असता तर डझनभर लोकांना आपला जीव गमवावा लागला असता. सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी रात्री भारत-पाक सीमेवर ड्रोनचा आवाज ऐकू आला. गावातील लोकांनी तत्काळ पोलिस आणि बीएसएफ अधिकाऱ्यांना कळवले. शनिवारी रात्रीच, बीएसएफचे जवान आणि पोलिसांनी या भागात शोधमोहीम सुरू केली. रविवारी रात्री उशिरा, येथून २ किलोहून अधिक आरडीएक्स, ५ ग्रेनेड आणि १०० पेक्षा जास्त गोळ्या जप्त करण्यात आल्या.

टॅग्स :Bombsस्फोटकेPakistanपाकिस्तानPunjabपंजाबPoliceपोलिसBorderसीमारेषाIndependence Dayस्वातंत्र्य दिन