गौतम नवलाखांसह इतरांना १४ डिसेंबरपर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 06:00 PM2018-11-22T18:00:54+5:302018-11-22T18:01:30+5:30
१४ डिसेंबरपर्यंत अटक न करण्याचे पुणे पोलिसांनी निर्देश हायकोर्टाने आज दिले आहेत.
मुंबई - माओवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी आरोपी असलेले गौतम नवलखा यांच्यासह इतरांना मुंबई हायकोर्टाने तूर्तास दिलासा दिला आहे. १४ डिसेंबरपर्यंत अटक न करण्याचे पुणे पोलिसांनी निर्देश हायकोर्टाने आज दिले आहेत.
झारखंडचे मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टान स्वामी (वय ७०) यांनीही एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तेलतुंबडे यांच्याप्रमाणे स्वामी यांच्याही घराची आणि कार्यालयाची पुणे पोलिसांनी झाडाझडती घेतली. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, त्यांना अटक करण्यात आली नाही. न्यायालयाने त्यांनाही ३१ आॅक्टोबरपर्यंत अंतरिम दिलासा दिला होता. या प्रकरणातील आरोपी अरुण फरेरा आणि वेर्नोन गोन्साल्विस यांचा जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर या दोघांनीही तातडीने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे दाखल करण्याचे निर्देश देत अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला होता.