मुंबई - ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. चंदा कोचर यांनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. न्या. नितीन जामदार आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. बँकेने चंदा कोचर यांच्या विरोधात केलेल्या बडतर्फीच्या कारवाईला चंदा कोचर यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं.
चंदा कोचर निलंबन प्रकरणी आरबीआयला उत्तर देण्याचे कोर्टाचे निर्देश
चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेविरुद्ध हायकोर्टात
राष्ट्रीयकृत बँकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला बडतर्फ करताना रिझर्व्ह बँकेची आधी परवानगी घ्यावी लागते. तशी कोणतीही परवानगी न घेता कारवाई करण्यात आल्याचा आरोप या सुनावणीत करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणी आरबीआयला प्रतिवादी करण्यात यावं असे निर्देश हायकोर्टाने दिले होते. परंतु, २०१९ मध्ये चंदा कोचर यांना पदावरुन हटवण्याच निर्णय जाहीर करण्यात आला होता. तसेच हा निर्णय सगळ्या नियमांची पूर्तता करुन कायदेशीर पद्धतीने घेतला गेला. बँकेच्या नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याला गैरप्रकार किंवा आर्थिक नफ्यात तूट केल्याच्या प्रकरणावरुन काढण्यात आलं तर त्यापूर्वी त्याला दिलेल्या आर्थिक भत्त्यांची रक्कम बँक परत घेऊ शकते. व्हिडीओकॉन या कंपनीला दिलेल्या हजारो कोटींच्या कर्जात चंदा कोचर यांनी नियमांचे पालन केले नाही असा दावा कंपनीकडून करण्यात आला. याचा ठपका ठेवून चंदा कोचर यांना पदावरुन हटवण्यात आलं.
चंदा कोचर यांच्याकडे पुन्हा ईडी करणार चौकशी
ईडीची मोठी कारवाई, चंदा कोचर यांची मुंबईतल्या घरासह ७८ कोटींची संपत्ती जप्तचंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेत सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असताना आयसीआयसीआय बँकेने वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन समूहाला ३२५० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. त्याबदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत ६४ कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप आहे. धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला २० बँकांच्या ग्रुपनं कर्ज दिलं होतं. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा १० टक्के होता. मात्र, धूत यांनी आयसीआयसीआयकडून मिळणाऱ्या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्यासोबत मिळून नूपॉवर रिन्यूएबल्स नावाची कंपनी सुरु केली. ज्यात दीपक यांची ५० टक्क्यांची भागीदारी होती. हा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत शेअरहोल्डर अरविंद गुप्तांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती.