अभिनेत्री कंगना राणौत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. आता कंगनाला आलेल्या पासपोर्ट प्राधिकरणाने पासपोर्ट नूतनीकरणास नकार दिल्याने हायकोर्टाची पायरी चढावी लागली आहे. अभिनेत्री कंगनाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र, मुंबई हायकोर्टाकडून अद्याप कोणत्या प्रकराचा दिलासा मिळालेला नाही. या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र सुनावणी दरम्यान कंगनाला दिलासा मिळालेला नाही. येत्या २५ जूनला या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे.
कंगनावर वांद्रे पोलिस स्थानकात देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याने तिच्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी समस्या निर्माण झाली आहे. कंगना राणौतला तिच्या धाकड सिनेमाच्या शूटिंगसाठी हंगेरी या देशात जायचं आहे. मात्र, कंगनाचा पासपोर्टची मुदत १५ सप्टेंबरपर्यंतच असल्याने तिला पासपोर्टचं तातडीने नूतनीकरण करणं गरजेचं आहे. अन्यथा कंगनाला परदेशवारी करण्यात मर्यादा येऊ शकतात. यासाठीच कंगनाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी या याचिकेवर सुनावणी पार पडली आहे. कंगनाने वकील रिजवान सिद्दीकी यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे.