टिकटॉक अ‍ॅपविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 01:34 PM2019-11-19T13:34:39+5:302019-11-19T13:38:38+5:30

टिकटॉकमुळे तरूणाईवर विपरीत परिणाम होत असल्याने त्यावर बंदीची मागणी करत मुंबईतील एका गृहिणीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

The High Court's refusal to immediately hearing on a petition against the Tiktok app | टिकटॉक अ‍ॅपविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार 

टिकटॉक अ‍ॅपविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार 

Next
ठळक मुद्दे नियमित तारखेनुसार सुनावणी घेण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. हिना दरवेश यांनी वकील अली काशिफ खान यांच्यामार्फत ही याचिकेवर हायकोर्टात दाखल केली आहे.

मुंबई - टिकटॉक अ‍ॅपविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे नियमित तारखेनुसार सुनावणी घेण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. टिकटॉकमुळे तरूणाईवर विपरीत परिणाम होत असल्याने त्यावर बंदीची मागणी करत मुंबईतील एका गृहिणीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 

ही याचिका दाखल करणारी महिला मुंबईतील असून तिचे नाव हिना दरवेश असं आहे. याचिका दाखल करताना हिना या गृहिणीने टिकटॉकचा वापर केल्याने मुलांवर वाईट संस्कार होतात, असा दावा करत टिकटॉक अ‍ॅपवर बंदी आणण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. यासह या अ‍ॅपमध्ये अश्लील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्याचा वाईट परिणाम मुलांवर होतो. हिना दरवेश यांनी वकील अली काशिफ खान यांच्यामार्फत ही याचिकेवर हायकोर्टात दाखल केली आहे.

Web Title: The High Court's refusal to immediately hearing on a petition against the Tiktok app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.