मुंबई - नीरजकुमार देसाईचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकाला जोडणारा हिमालय पूल कमकुवत झाल्याची कल्पना असतानाही त्याच्या वापरास परवानगी दिल्याचा आरोप नीरज देसाई या ऑडिटरवर आहे. १४ मार्च रोजी घडलेल्या हिमालय पूल दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू तर ३३ जण जखमी झाले होते. हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या नीरजकुमार देसाईविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी ७०९ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. चुकीचा अहवाल दिल्यामुळे अपघात झाल्याचा ठपका यात ठेवण्यात आला असून १६४ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. नीरजकुमार देसाई काम पाहत असलेल्या प्रोफेसर डीडी देसाई असोसिएट इंजिनीअरिंग कन्सल्टंट अॅण्ड अॅनॅलिस्ट कंपनीकडे पालिकेने मुंबईतील ३९ महत्त्वाच्या पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची जबाबदारी दिली होती. सप्टेंबर, २०१६ मध्ये त्याला याचे काँट्रॅक्ट मिळाले. त्यानंतर उड्डाणपूल, स्कायवॉक, भुयारी मार्ग, रेल्वे मार्गावरील पूल अशा स्वरूपाच्या सर्व प्रकारच्या एकूण ७६ पुलांचे त्याने ऑडिटिंग केले. त्यापैकी सीएसएमटी पुलाचे त्याने ३ वेळा ऑडिटिंग केले. ‘तो पूल धोकादायक नसून, त्याला किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे,’ असा अहवाल त्याने पालिकेला दिला होता. मात्र १४ मार्चला पूल कोसळला. सीएसएमटी येथील या हिमालय पूल दुर्घटनेत ७ जण ठार तर ३१ जण जखमी झाले. या अपघातानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत आझाद मैदान पोलिसांनी देसाईला अटक केली होती.
हिमालय पूल दुर्घटना : नीरजकुमार देसाईचा जामीन कोर्टाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 19:13 IST
या अपघातानंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत आझाद मैदान पोलिसांनी देसाईला अटक केली होती.
हिमालय पूल दुर्घटना : नीरजकुमार देसाईचा जामीन कोर्टाने फेटाळला
ठळक मुद्देसीएसएमटी पुलाचे त्याने ३ वेळा ऑडिटिंग केले. ‘तो पूल धोकादायक नसून, त्याला किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे,’ असा अहवाल त्याने पालिकेला दिला होता. मात्र १४ मार्चला पूल कोसळला. सीएसएमटी येथील या हिमालय पूल दुर्घटनेत ७ जण ठार तर ३१ जण जखमी झाले.