हरियाणा येथील सिरसा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे रविवारी रात्री एक तरुण आणि तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांना तरुणाच्या तळहातावर आत्महत्येचे कारण लिहिल्याचे सापडले आहे. 'पुढच्या वेळी देवा एकाच जातीत जन्म द्या. मी आणि न्यासा दोघेही एकमेकांवर प्रेम करतो. माझे मामा ओमप्रकाश फौजी पचरनवाली आणि मामाचा मुलगा रामकुमार हे लग्न केल्यास जीवे मारण्याची धमकी देत होते. दे दोघे आमच्या मृत्यूला दोघेही जबाबदार आहेत, असं हातावर लिहिले आहे.
या सुसाईड नोटवरुन या दोघांच्या लग्नात जात-धर्म आड येत होते असं समोर आले आहे. त्यामुळे हे दोघेही राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यातून फरार झाले झाले होते. मृतांची नावे 23 वर्षीय निसा रहिवासी छनी बडी तहसील भद्रा हनुमानगड असून ती मुस्लिम असून 25 वर्षीय अरुण कुमार रा. सराटोडा हनुमानगढ तो जाट जातीतील आहे. सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी मामा ओमप्रकाश आणि चुलत भाऊ रामकुमार यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
डबल मर्डर… भाजप नेत्यासह पत्नीची हत्या, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवले मृतदेह!
रविवारी रात्री उशिरा हे तरुण-तरुणी नवीन धान्य मार्केटसाठी चिन्हांकित केलेल्या मैदानात संशयास्पद स्थितीत पडलेले आढळून आले. राजस्थान पासिंगची कार जवळच उभी होती, दोघांनीही विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच सदर पोलीस ठाण्याने पंचनामा करताना दोन्ही मृतदेह शवागारात ठेवले. सोमवारी सकाळी दोन्ही मृतांचे नातेवाईक पोहोचले, त्यांची ओळख पटली आणि यावेळी पोलिसांना तरुणाच्या खिशातून एक सुसाइड नोट मिळाली.
दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्याचे तरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. त्यामुळे तिचे मामा ओमप्रकाश आणि चुलत भाऊ राजकुमार यांनी लग्न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळेच त्याला आत्महत्या करावी लागल्याचे यात लिहिले आहे. त्यांच्या मृत्यूला दोघेही जबाबदार आहेत. सुसाईड नोटच्या आधारे कारवाई करताना पोलिसांनी मामा ओमप्रकाश फौजी आणि चुलत भाऊ राजकुमार यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.